Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार व नागरिक कर्तव्ये पार पाडतील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार व नागरिक कर्तव्ये पार पाडतील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

मुंबई, दि. 3 :- महाराष्ट्राचं आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी, जिद्द, बुद्धीचातुर्य, संयमानं त्याला पराभूत करता येतं हे महाराजांनी वारंवार सिद्ध केलं. महाराजांचे हे कर्तृत्व व निर्माण केलेला राज्यकारभाराचा आदर्श प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणा देईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे, कार्याचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.

पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान, राष्ट्राभिमान शिकवला. संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. आज तीनशे वर्षांनंतरही महाराजांचं कार्य, त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देत आहेत. महाराजांनी दिलेल्या विचारांवर राज्य सरकारची वाटचाल सुरु आहे. राज्यावरील कोरोनाचं संकट आज सगळ्यात मोठं आहे. या संकटाचा मुकाबला करताना, सरकार आणि नागरिक दोघेही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून आपापली कर्तव्ये पार पाडतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यदिनी त्यांना अभिवादन करताना व्यक्त केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लॉकडाऊन टाळू शकतो, पण नियम पाळण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

मोठी बातमी ; राज्यात अंशत लॉकडाऊन जाहीर

Next Post
मोठी बातमी ; राज्यात अंशत लॉकडाऊन जाहीर

मोठी बातमी ; राज्यात अंशत लॉकडाऊन जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo