Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जन- धन बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी वेळापत्रक-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जन- धन बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी वेळापत्रक-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन

जिल्ह्यातील महिला खातेदारांनी पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करू नये

जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज’च्या माध्यमातून जन- धन योजनेंतर्गत खाते असलेल्या महिल्यांच्या खात्यावर 500 रुपये प्रति महिना या प्रमाणे पुढील तीन महिन्यांसाठी पैसे जमा केले जाणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिलांनी ‘सोशल डिस्टन्स’चा वापर करीत ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करीत बँकेत गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे, महिलांच्या जन- धन खात्यात पहिल्या टप्यातील 500 रुपये जमा झाले आहेत. ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांनी घाई करू नये. पैसे बँकेत सुरक्षित आहेत. खातेदार त्यांच्या सोयीनुसार पैसे काढू शकतात. मात्र, जे लाभार्थी तातडीने पैसे काढू इच्छित असतील त्यांनी वेळापत्रकानुसार पैसे काढावेत. तसेच ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्स’चा वापर करावा. तसेच पैसे काढण्यासाठी बँक मित्र किंवा ग्राहक सेवा केंद्राचा (CSP) उपयोग करता येईल.
सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या एटीएमचा वापर करावा. ‘कोरोना’ विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे बँकेत गर्दी करू नये.
या वेळापत्रकानुसार 3 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक शून्य किंवा एक आहे त्यांनी पैसे काढावेत. 4 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक दोन किंवा तीन आहे त्यांनी पैसे काढावेत. 7 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक चार किंवा पाच आहे त्यांनी पैसे काढण्यासाठी यावे. 8 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा क्रमांक 6 किंवा 7 आहे त्यांनी पैसे काढण्यासाठी यावे. 9 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक 8 किंवा 9 आहे त्यांनी पैसे काढण्यासाठी यावे. तसेच बँकेत योग्य अंतर राखून पैसे काढण्यासाठी थांबावे, ठरवून दिलेल्या अंकाव्यतिरिक्त इतर कोणीही बॅकींग कामासाठी अनावश्यक बाहेर आढळल्यास त्यांचेवर पोलीस विभागाचे सक्त कारवाई करावी. असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या दोघांविरूध्द पाचोऱ्यात गुन्हा दाखल

Next Post

एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

Next Post
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo