Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळके महावितरण शाखा कार्यालयात सामानाची तोडफोड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जळके महावितरण शाखा कार्यालयात सामानाची तोडफोड

जळके/जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील जळके (वसंतवाडी) येथे काल दि. १६/०९/२०१९ रोजी वसंतवाडी तांडा येथे वीजचोरी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये लघुदाब वाहिनी चा कंडक्टर काढून कमी क्षमतेची केबल टाकण्यात आली. काम झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर चालु करण्यास लाईनस्टाफ गेले असता सदर ठिकाणी काही ग्रामस्थांनी ” सर्वांची लाईट सुरु ठेवा नाहीतर डीपी चालु करू देणार नाही. लाईट तुमच्या बापाची नाही” सांगुन कर्मचाऱ्यांना ट्रान्सफॉर्मर चालु करण्यास मज्जाव केला. त्यामुळे वसंतवाडी सरपंच श्री. पाटील यांना हि माहीती  कळवून कर्मचारी  तेथुन माघारी आले  संध्याकाळी ६.३०वाजेचे सुमारास तेथील (मीटरधारक व आकडेधारक) ४० ते ५० ग्रामस्थांनी सबस्टेशन मधे येऊन ऑपरेटर व लाईनस्टाफ ला धमकविण्याचा प्रयत्न केला. तसेच प्लास्टिक खुर्च्या तोडून, लॉगशीट ,रेकॉर्ड फाईल, रजिस्टर्स फाडून कंपनीचे मालमत्तेचे नुकसान केले आहे.  संध्याकाळी  एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. बर्‍याच जबाब, विचारणा, पडताळणी अंती मध्यरात्री १वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल करण्यात आली. घटनेच्या वेळी सबस्टेशन मधे उपस्थित असलेले श्री. महाजन यांनी गु.र.नं. ६६१ प्रमाणे ९जणांविरुद्ध कलम ३५३, ४२७ व इतर ६कलमांनुसार फिर्याद दिली आहे.  एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करतेवेळी ऑपरेटर महाजन यांचेसोबत अभियंता सुलक्षणे आणि वावडदा कक्षातील सर्व लाईनस्टाफ तसेच वसंतवाडी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष इ. उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाणी बचतीच्या संस्कारातून पाण्याचे जतन करू या – डॉ. सुब्रमण्यन

Next Post

जिल्हा क्रिडा व जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

जिल्हा क्रिडा व जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo