Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव जिल्ह्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर – पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगांव जिल्ह्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर – पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील

तातडीच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज


जळगाव(प्रतिनिधी)-  कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व औषधोपचाराचा तुटवडा होऊ नये यादृष्टीने २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक विकास योजनेतून 4 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला असून  तातडीच्या उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील  यांनी दिली आहे. याबाबत वृत्त असे की, कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यातच मेहरूण येथे एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्‍वभूमिवर, ना. गुलाबराव पाटील यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा रूग्ण आढळला असला तरी तो बाहेरून आलेला होता. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कारण प्रशासन या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आधीपासूनच सज्ज असून आता तातडीने नवीन सामग्री खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हील सर्जन-जिल्हा रूग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासाठी विविध सामग्रीचा समावेश करण्यात आलेला आहे. यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रौढ व बालकांसाठी इनव्हेसीव आणि नॉन इनव्हेसीव या दोन्ही प्रकारातील व्हेंटीलेटर्ससह अन्य सामग्री खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये फेस मास्क, सॅनिटायझर, हातमोजे आदींसह अन्य सामग्रीचा समावेश आहे. ही सामग्री सुमारे २.४४ कोटी रूपयांचा आहे. तर जिल्हा रूग्णालयाचे सिव्हील सर्जन यांच्यासाठी एकूण ७४.८७ लाख रूपयांची खरेदी करण्यात येणार आहे. यात उशी व गाद्यांसह बेड, पीईपी किट, सॅनिटायझर आदींसह अन्य सामग्रीचा समावेश आहे.दरम्यान, ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसाठी सुमारे ५९.५६ लाख रूपयांची सामग्री खरेदी करण्यात येणार आहे. याच्या मध्ये अल्कोहोलयुक्त सर्जीकल हँड सोल्युशन, ट्रिपल लेअर फेस मास्क, थर्मामीटर स्कॅनर आदींसह अन्य औषधींचा समावेश आहे. या तिन्ही विभागांसाठी तातडीच्या उपाययोजना म्हणून या खरेदीला प्रशासनाने मान्यता दिली असून येत्या एक-दोन दिवसात जिल्ह्यातील जनतेसाठी ही सामग्री उपलब्ध होणार आहे. कोरोना विषाणूचा आपल्या सर्वांनी यशस्वीपणे प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण एकत्रीतपणे लढा देणार आहोत. यासाठी प्रशासन तर सज्ज आहेच पण याला यशस्वी करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. यामुळे आपण कोरोनाचा यशस्वी सामना करू असा नक्कीच विश्‍वास वाटतो असे ना. गुलाबराव पाटील यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूर येथील नगरसेविका सायमा बी मलक यांच्यावतीने नागरिकांना, पोलीस व न. पा. कर्मचाऱ्यांना 500 मास्क वाटप

Next Post

चल कोरोना समजून घेऊ…

Next Post
चल कोरोना समजून घेऊ…

चल कोरोना समजून घेऊ…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo