Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव बस स्थानकावरील हिरकणी कक्षाची दुरवस्था

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगांव बस स्थानकावरील हिरकणी कक्षाची दुरवस्था

हिरकणी कक्ष फक्त एक शोपीस: शध्यांकाळ नंतर कक्षात अंधार

जळगाव – (चेतन निंबोळकर) – बालकांच्या विकासासाठी सुरवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे, यासाठी शासनाने काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचाही समावेश आहे. स्तनदा मातांना आपल्या लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या प्रत्येक आगारात हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे. मात्र, हे कक्ष मातांना स्तनपान करण्यास योग्य राहिले नाहीत. अशीच परिस्थिती जळगांव बस स्थानकावर पाहायला मिळत आहे. येथे असलेला हा हिरकणी कक्ष मात्र केवळ नावालाच उरला आहे. या कक्षात कसल्याच सुविधा नसल्याने त्याचा वापर फिरस्ते, भिकारी व स्थानकातील भंगार ठेवण्यासाठी होत आहे. कक्षाच्या दुरवस्थेमुळे स्तनदा अशा वेळी महिलांना आपल्या बाळासह बस स्थानकात बसून बससाठी प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी गर्दी असलेल्या बस स्थानकात बाळांना असे उघड्यावर दूध पाजतांना महिलांची कुचंबणा होते. जळगांव बस स्थानकावरील हिरकणी कक्षाची दुरवस्था झाली असून यात महिलांना बसण्यासाठी जागा नाही तसेच लाइट, पंखा यांची सोय नसून याचा लाभ घेण्याजोगा नसल्याने हा हिरकणी कक्ष फक्त एक शोपीस म्हणून आहे. या दयनीय अवस्थेमुळे महिला प्रवाशांना काहीही उपयोग होत नाही. या हिरकणी कक्षामध्ये प्रचंड अस्वच्छता असून, दुर्गंधी पसरली आहे. कक्षाची एकदाही स्वच्छता केलेली दिसून येत नाही. तसेच कक्षाच्या भिंती या पान, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. तसेच या कक्षात धूळ ही मोठ्या प्रमाणात बसली असून या कक्षाचा संपूर्णत: बोजवारा उडाला आहे. अशा परिस्थितीत महिला या कक्षात येण्यास धजावत नाहीत.
जळगांव बस स्थानकावरून नांदेड, बीड, लातूर, नाशिक, शिर्डी, शेगांव, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, मुंबई, पुणे, सातारा या महत्त्वाच्या शहरांना बस जातात, या स्थानकात प्रवाशांची संख्या त्यातही महिलांची संख्या जास्त असते. येथे हिरकणी कक्ष स्थापन झाल्यापासून हा कक्ष अवघे काही दिवसच सुस्थितीत होता. परंतु, आता या कक्षाची दुरवस्था झाली आहे. या कक्षाचा वापर महिलांऐवजी फिरस्ते व भिकारी करीत आहेत. दुरवस्थेमुळे महिलांना या कक्षाचा वापर करता येत नाही.

सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

दरम्यान, हा कक्ष केवळ नावालाच राहिला असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. या कक्षाची दुरुस्ती करून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महिलांमधून होत आहे. जेणेकरून महिलांना त्याचा वापर करता येईल आणि त्यांची गैरसोय टळेल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उद्या नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगणार पतंगोत्सव

Next Post

वृत्तवाहिनी विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी अभिजित पाटील तर जिल्हाकार्यध्यक्ष पदी संतोष ढिवरे

Next Post

वृत्तवाहिनी विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी अभिजित पाटील तर जिल्हाकार्यध्यक्ष पदी संतोष ढिवरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo