Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव शहरातील खड्यांच्या दुरव्यवस्थांमुळे लोकप्रतिनिधींना “फटका” बसण्याची शक्यता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

जळगांव शहराला लाभली आहे खराब रस्त्यांची “देणगी”?

जळगांव(प्रतिनिधी)- एकीकडे प्रशासन खड्डे बुजविण्याचा दावा करत असले तरी शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचं चित्र आहे. जळगावातील रस्त्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे की यामुळे फक्त जीव घ्यायचा तेवढा बाकी आहे. मणक्यांचे असह्य दुखणे निर्माण झाले आहे व असह्य अशा वेदना होतात. असे शहरातील जेष्ठ नागरिक व तरुणांचे म्हणणे आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे कुणाचा जीव जात आहे तर अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा ‘सामना’ करावा लागत आहे. जळगावातील खड्डे तर आरोग्याचे वैरी बनलेले आहेत. शहरातील खड्डय़ांमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा, त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न याची जबाबदारी नेमकी कोणाची या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी मौन पाळले असले, तरी खड्यांमूळे आरोग्य संकटात येत आहे. शहरातील रस्ते हे अपघाताचे सापळे ठरत असून दुचाकी वाहने तसेच चार चाकी वाहने चालविण्याऱ्यांना पाठीच्या, पायाच्या तसेच सांध्यांच्या विकाराचा सामना करावा लागत आहे. या खड्डय़ांमुळे अनेकांना मणके तसेच सांधेदुखीच नव्हे, तर हृदयविकाराचा त्रासही उद्भवू शकतो. गर्भवती महिलांना रुग्णालयात जाताना होणाऱ्या त्रासाची कल्पना तरी या लोकप्रतिनिधींना आहे का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. शहरातील सर्व रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून त्यामुळे पाठीच्या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील रस्ते हे आजपर्यंत कधी नव्हे इतके खराब झाले आहेत. ठिकठिकाणी पडलेले मोठ-मोठे खड्डे, त्यातून कसरत करीत वाहने चालवावी लागत असून दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. जळगांव आज खड्ड्यांचे शहर म्हणून खराब रस्त्यामुळे प्रसिद्ध होत आहे. तसेच खड्यांचे “माहेरघर” म्हणून जळगांव शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. शहरातील रस्ते खराब असल्याची ओरड एवढी की, या प्रश्नाकडे कानाडोळा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याची सवयच झाली आहे! जळगांव शहराच्या रस्त्यांसाठी नाना प्रकारची आंदोलने झाली. पण लोकप्रतिनिधी मात्र ढिम्मच.  शहरातील या खराब रस्त्यांमुळे हाडे अक्षरश: खिळखिळी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मानदुखी, पाठदुखी, खांदे दुखीसह  इतर दुखणे कायमचे मागे लागेल अशी भीती शहरातील नागरिकांमध्ये आहे. शहरातील खराब रस्त्यांविरोधात काही सजग नागरिकांनी आंदोलन ही सुरू केले. तरीही लोकप्रतिनिधींनी रस्त्यांवरील खड्डय़ांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. काही ठिकाणी माती टाकून खड्डे बुजविण्याचे थातूर-मातूर उद्योग वगळल्यास रस्त्यासाठी फार काही घडले नाही. तसेच शहरातील शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने शाळकरी विद्यार्थी आणि पालकांना चालतांना त्रास होत आहे. शहरातील या खराब रस्त्यांमुळे शाळकरी लहान मुलांना आता पासूनच आपल्या दुखण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी काही पत्रकारांना शहरातील खड्यांसंदर्भात मुलाखती दिल्या असता, लोकप्रतिनिधी म्हणाले की शहरातील खड्डे हे “अमृत जल योजना” यामुळे बनले आहे. तर अमृत जल योजनेचे काम सुरू होण्यापूर्वी शहरात खड्डे नव्हते का? असा प्रश्न सुजान नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील खड्यांमूळे नागरिकांमध्ये प्रचंड मनस्ताप असून येणाऱ्या निवडणुकीत ते हा राग योग्य लोकप्रतिनिधी ला मतदान करुन व्यक्त करणार आहे. असे नागरिकांनी बोलून दाखविले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भडगांव मध्ये राष्ट्रवादीची “प्रचार रँली” उत्साहात;मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

Next Post

भिल्ल समाजाचा महायुतीचे उमेदवार आ.राजूमामा भोळे यांना जाहीर पाठींबा

Next Post
भिल्ल समाजाचा महायुतीचे उमेदवार आ.राजूमामा भोळे यांना जाहीर पाठींबा

भिल्ल समाजाचा महायुतीचे उमेदवार आ.राजूमामा भोळे यांना जाहीर पाठींबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d