Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावचा किशोर औरंगाबाद मॅरेथॉनचा अँबेसेडर जागतिक किडनी दिनानिमित्त औरंगाबादेत होतेय भव्य आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – दि. १२ मार्च रोजी जागतिक किडनी दिवस आहे. त्या निमित्ताने संपूर्ण जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या निमित्तानेच येत्या १ मार्च रोजी औरंगाबाद शहरात भव्य किडनीथॉन म्हणजेच मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. जळगावसाठी ही अभिमानाची बाब आहे की या मॅरेथॉनच्या इव्हेन्ट अँबेसेडर म्हणून जळगावच्या किशोर सूर्यवंशींची निवड करण्यात आली आहे. या संदर्भाचा मेल नुकताच किशोरला प्राप्त झाला आहे.

औरंगाबाद शहरात किडनी दिनानिमित्त दरवर्षी किडनीथॉनचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये दरवर्षी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील तरुणाई आणि क्रीडाप्रेमी आणि त्या सोबतच अवयव प्रत्यारोपण झालेल्या, अवयव दान केलेल्या व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक मोठया प्रमाणात सहभागी होत असतात. अवयव दान जनजागृतीसाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत असते. १०, ५ आणि २ किलोमीटर अश्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ही मॅरेथॉन संपन्न होणार आहे.  किशोरने गेल्या वर्षी इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये भारतातर्फे प्रतिनिधित्व केले होते. इंग्लंड येथे झालेल्या या गेम्स मध्ये भारतातून एकूण पंधरा खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव किशोरची निवड करण्यात आली होती. अवयव प्रत्यारोपण झाल्यानंतर देखील फिट अँड फाईन राहून आयुष्य मजेत जगता येतं हा संदेश देण्यासाठी या जागतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. 
धावणे आणि बॅडमिंटन या क्रिडा प्रकारांमध्ये किशोर नियमित सराव करीत असतो. वेगवेगळ्या शहरात आयोजित होणाऱ्या विविध  किशोर सहभा सकाळी जवळ-जवळ दोन तास या सरावासाठीतो तो देत असतो. या सोबतच तो छाया किडनी फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयव दान चळवळीवर देखील आपल्या सहकाऱ्यांसमवेत कार्य करीत आहे. जागतिक किडनी दिनानिमित्त छाया किडनी फाऊंडेशन तर्फे दि. १३ मार्च रोजी ऑर्गन डोनेथॉन या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद मॅरेथॉनसाठी इव्हेन्ट अँबेसेडर म्हणून  झालेल्या या निवडी बद्दल किशोरचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावकरांनी शहर स्वच्छ ठेवावे! – महापौर भारती सोनवणे

Next Post

“ध्येय व यश प्राप्ती साठी गरीबी अडसर ठरत नाही”-उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे

Next Post

"ध्येय व यश प्राप्ती साठी गरीबी अडसर ठरत नाही"-उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo