Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात पत्रकार संघ व नजर फाउंडेशन च्या वतीने ६८५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगावात पत्रकार संघ व नजर फाउंडेशन च्या वतीने ६८५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मुल्यांसह संस्कार जपावे!
पत्रकार संघाच्या शालेय साहित्य वाटप प्रसंगी अपरजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे प्रतिपादन

जळगाव – सध्या तंत्रज्ञानिक युग असून मोबाईलमुळे जग जवळ येत असून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मुल्यांसह संस्कार जपावे असे प्रतिपादन अपरजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शालेय साहित्य वाटपप्रसंगी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन जळगावतर्फे पत्रकार, वृत्तपत्र विक्रेता यांच्या पाल्यांसह गरीब, गरजू, गुणवंत विद्यर्थ्यांना मोफत शालेय साहित्य मंगळवार, दि.९ जुलै रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृह जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते ६८५ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार विजय पाठक हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, देशदूतचे महाव्यवस्थापक विलास जैन, जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थाचे मानद सचिव निलेश भोईटे, साईमतचे संपादक प्रमोद बर्‍हाटे, लाईव्ह ट्रेंडचे संपादक शेखर पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रविणसिंग पाटील, मास मिडीया विभाग प्रमुख बेंडाळे महाविद्यालयाचे डॉ. जयंत लेकुरवाळे, सामाजिक कार्यकर्ते अजय बढे, एल.एच.पाटील इंग्लिश स्कूल जळगांवचे संचालक कुणाल पाटील, प्रॉकसॉन कंपनीचे श्री.काजी,सागर चौधरी,मुकेश सोनवणे,जैन इरिगेशनचे मिडीया विभाग प्रमुख अनिल जोशी,मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, सामाजिक कार्यकर्ते हरीचंद्र सोनवणे,विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. गाडीलकर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावे तसेच साहित्याचा योग्य वापर करुन नियमित अभ्यास करावे असे त्यांनी व्यक्त केले.
जेष्ठ पत्रकार शेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, पालकांनी आपल्या मुलांकडे स्मार्ट फोन देऊ नये कारण मोबाईलमुळे संस्कृती तसेच विद्यार्थी अभ्यास न करता मोबाईलमधील वेगवेगळे गेम खेळत असल्याने मोबाईल हा एक प्रकारे बॉम्ब आहे त्यामुळे मोबाईलचा वापर योग्य वेळी करावा व आपला मुलगा मोबाईलमध्ये काय करत आहे याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जेष्ठ पत्रकार विजय पाठक यांनी सांगितले की, सध्या सामाजिक बांधिलकी कमी होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षण शिकणे काळाची गरज असून ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले त्यांनी त्याचा योग्य तो वापर करावा व नियमित अभ्यास करुन आपले ध्येय साध्य करावे असे त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे म्हणाले की,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात सामाजिक हित जोपासत उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी व त्यांच्यावर संस्कार रुजविण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असते याच उद्देशाने असे कार्यक्रम राबवित असल्याचे सांगून भविष्यातही असे उपक्रम राबविले जातील असे प्रास्ताविक करतांना सांगितले.
यावेळी ६८५ विद्यार्थ्यांना दप्तर,वॉटरबॅग,कंपासपेटी, डबा,वह्या असे साहित्य वाटप करण्यात आले.तसेच संघाचे पदाधिकार्‍यांना हेल्मेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी तर आभार शरद कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हासंघटक भगवान मराठे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश बागडे, शैलेश पाटील, संतोष ढिवरे, अनुप पानपाटील,चेतन निंबोळकर, हेमंत विसपुते, स्वप्निल सोनवणे, परशुराम बोंडेे, सचिन पाटील,सुनील भोळे, मुकेश जोशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दिपक सपकाळे,महानगर अध्यक्ष राजेंद्र पाटील, सुकलाल सुरवाडे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कायद्या विषयी थोडक्यात

Next Post

‘जलशक्ती अभियान’ यशस्वीतेसाठी कार्यशाळा संपन्न-जलस्त्रोतांची अद्यावत माहिती तयार करण्याच्या जिल्हाधिकारी ढाकणे यांच्या सूचना

Next Post
‘जलशक्ती अभियान’ यशस्वीतेसाठी कार्यशाळा संपन्न-जलस्त्रोतांची अद्यावत माहिती तयार करण्याच्या जिल्हाधिकारी ढाकणे यांच्या सूचना

'जलशक्ती अभियान' यशस्वीतेसाठी कार्यशाळा संपन्न-जलस्त्रोतांची अद्यावत माहिती तयार करण्याच्या जिल्हाधिकारी ढाकणे यांच्या सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo