Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात 7 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय कापूस परिषदेचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगावात 7 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय कापूस परिषदेचे आयोजन

कृषि, वस्त्रोद्योग मंत्री, पालकमंत्री, कृषि राज्यमंत्र्यांसहराहूरी, परभणी व अकोला कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुंची राहणार उपस्थिती

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- कापसाच्या नवीन वाणांची माहिती, कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण व इतर घटकांबाबत जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीजास्त माहिती व्हावी, याकरीता जागतिक कापूस दिनाचे औचित्य साधून कृषि विभागातर्फे जिल्ह्यात 7 ऑक्टोबर, 2021 रोजी एकदिवशीय राज्यस्तरीय कापसू परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात कृषी विभागातर्फे या एक दिवसीय राज्यस्तरीय कापूस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कापूस पिकासाठीचे तंत्रज्ञान, उत्पन्नवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांसह इतर विषयांवर तज्ञांची चर्चासत्रे व नाविन्यपूर्ण बाबींचे कृषी प्रदर्शन लावण्यात येणार आहे.राज्यस्तरीय कापूस परिषदेच्या नियोजनाच्या अनुषंगाने नुकतीच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

या बैठकीस कृषी संचालक(विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संशोधन संचालक शरद गडाख, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, कापुस पैदासकार संजीव पाटील, वरिष्ठ कृषि विद्या शास्त्रज्ञ बी.डी. जडे, मोहिम अधिकारी पी. एस. महाजन, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, महाबीज, जिनिंग प्रेसिंगचे प्रतिनिधी, खाजगी बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.या परिषदेला कृषी मंत्री दादाजी भुसे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, पालकमंत्री गुलाबराव पाटील कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी सचिव, कृषी आयुक्त, राहुरी परभणी व अकोला कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, कृषी निविष्ठा कंपनीचे प्रतिनिधी तसेच औरंगाबाद, बुलडाणा, जालना, अकोला, नंदूरबार व धुळे या जिल्ह्यातून निवडक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेचे कृषी विभागाच्या यूट्यूब चैनलद्वारे प्रसारण करण्यात येणार आहे. कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन या परिषदेच्यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांकडून प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी यावेळी दिल्यात.

Team Satymev Jayate

Previous Post

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे व थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा -जिल्हाधिकारी

Next Post

कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्न परवाना नोंदणी शिबिर संपन्न

Next Post
अन्न व्यावसायिकांचे परवाने तपासणीसाठी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम

कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्न परवाना नोंदणी शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo