Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्हयातुन निर्गमन करण्यास प्रतिबंध; जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हा सीमा बंदी आदेशाचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पथक नियुक्तीचे आदेश

(सिमाबंदी) आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल तसेच तपासणी नाक्यावरील कर्तव्यात कसुर केलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी


जळगांव(प्रतिनिधी)- राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादृर्भाव होवु नये, याकरीता शासन स्तरावर मोठया प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअनुषांने देशात तसेच राज्यात लॉक-डाऊन करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणुन जळगाव जिल्हयातील बॉर्डर  वर विशेष पथके नेमण्यात आलेले आहेत. सदरचे पथके हे सतत २४ तास हजर राहुन लॉक-डाऊन चे अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्हयातुन निर्गमन करण्यास प्रतिबंध (सिमाबंदी) आदेशाचे उल्लंघन करऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. चाळीसगाव शहरातील सुलतान अजीज खान वय – २४ धंदा – पेन्टींग रा.प्लॉट  नं.८, काका निवास शेजारी, पवारवाडी चाळीसगाव हा दोन महीण्यापुर्वी सायने तालुका मालेगाव येथे घराचे पेन्टींग कामाकरीता गेला होता त्यावेळी लॉक डाऊनमुळे तेथील काम बंद झाल्याने तो चाळीसगाव येथे परत आला. पुन्हा कामाचे पैसे बाकी असल्याने दिनांक 7एप्रिल रोजी चाळीसगाव येथुन त्याचे मोटार सायकलने सायने तालुका मालेगाव येथे गेला लॉक-डाऊन चालु असल्याने तो मालेगाव येथे त्याचे नातेवाईक यांचे कडे राहीला होता. आज दिनांक २१ रोजी सकाळी त्याचे जवळील मोटार सायकलीने मालेगाव मधील नुराणी नगर येथुन निघुन चाळीसगाव चौफुली – दहीवाळ – गिरणाडॅम फाटा – कलवाडी – पिलखोड मार्गे येथे आला तेथुन टाकळी – आडगाव – देवळी – बिलाखेड व चाळीसगाव येथे प्रवास करीत येवुन चाळीसगाव येथील पवारवाडीतील त्याचे घरी पोहचला. सुलतान अजीज खान याने लॉक-डाऊन मध्ये नियमाचे उल्लंघन केल्याने त्याचे विरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याची वैदयकीय तपासणी करुन त्याचे डावे हातावर कोरोटाईनचा शिक्का मारण्यात येवुन त्यास होम कोरोटाईन करण्यात आले आहे. तरी जळगाव जिल्यातील नागरिकांना जळगाव जिल्हा पोलीस दलाचे वतीने आवाहन करण्यात येते की, जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्हयातुन निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात आले असुन जे कोणी सिमाबंदी आदेशाचे पालन करणार नाहीत त्याचे विरुध्द (१) आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ , (२) भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ (३) Indian Penal Code – १८६२  या कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. सुलतान अजीज खान हा ज्या मार्गेने आला त्या मार्गेवरील पोलीस तपासणी नाक्यावरील कर्तव्यावर असलेले संबंधीत पोलीस अधिकारी कर्मचारी यांची संखोल चौकशी करुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संतांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी; अखिल भारतीय संत समितीतर्फे प्रांताना निवेदन

Next Post

मदत लागल्यास संपर्क करा, पण चुकीचे पाउल उचलू नका; विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना विनंती

Next Post

मदत लागल्यास संपर्क करा, पण चुकीचे पाउल उचलू नका; विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना विनंती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo