Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतीची संस्मरणीय भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2024
in जळगाव, राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतीची संस्मरणीय भेट

जळगाव, दि. 12 (जिमाका)- जळगाव जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना केद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युबयो ) योजनेतुन शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा या करीता टॅलेट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय यावल व दैनिक पुढारी यांच्यावतीने दिल्ली दर्शन व महामहीम मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची प्रत्यक्ष भेट घडवुन देण्यात आली.

यामध्ये यावल प्रकल्पात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वैजापूर येथील सोनिया बारेला, शासकीय आश्रम शाळा लालमाती शाळेतील शितल बारेला, शासकीय आश्रम शाळा गंगापुरी शाळेतील सुरेश बारेला, शासकीय आश्रम शाळा सार्वेतील श्याम पावरा तसेच विद्यार्थ्यांसमवेत पालक अधिकारी म्हणून वैजापूरच्या अधिक्षिका कुमारी श्वेंता टेंभुर्णी गेल्या होत्या.

सर्व विद्यार्थ्यांनी आग्रा येथे ताजमहाल दर्शन व दिल्ली गेट, कुतुबमिनार, लाल किल्ला, मा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग दिल्ली यांची भेट व राजघाट येथिल महात्मा गांधी म्युझियम, राष्ट्रपती भवनातील जनजाती संग्रहालय इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. राष्ट्रपती भावनात जाऊन महामहीम मा. राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत माहामहीम मा. राष्टपतीशी चर्चा केली.

सदर दौरा हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय राहील अशी अपेक्षा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार यांनी व्यक्त केली व दरवर्षी अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून अशा भेटींची संधी प्रत्येकाने मिळवावी यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा या करीता शुभेच्छा दिल्या.

या टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील श्री प्रशांत माहुरे , श्री राजेंद्र लवणे, श्री पवन पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल तसेच श्री व्ही. डी गायकवाड, श्री एम.डी पाईकराव, श्रीमती सुलताने मॅडम, श्री एल एम पाटील, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यावल व विकास पाटील व कृष्णा पाटील व कार्यालयातील इतर कर्मचारी व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी योगदान दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मनपा सहाय्यक आयुक्तांवर कठोर कारवाईची मागणी….

Next Post

घरगुती व लहान स्तरावरील राडारोडा वाहून नेणारी ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा आता ऑनलाईन, अधिक जलद आणि पर्यावरणपूरक

Next Post
घरगुती व लहान स्तरावरील राडारोडा वाहून नेणारी ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा आता ऑनलाईन, अधिक जलद आणि पर्यावरणपूरक

घरगुती व लहान स्तरावरील राडारोडा वाहून नेणारी 'डेब्रीज ऑन कॉल' सेवा आता ऑनलाईन, अधिक जलद आणि पर्यावरणपूरक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo