Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांना कृषी विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा ) :- जळगाव जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी कृषी विभागामार्फत महाआयटीद्वारे तयार केलेल्या नवीन संगणकीय प्रणालीद्वारे आपले सरकार या संकेतस्थळावर कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना आवश्यक कागदपत्रे समक्ष जमा न करता विहीत मुदतीत मिळणार आहे. त्यासाठी आपले बियाणे व खत परवाने आपले सरकार या वेब पोर्टलवर नोंदणी करुन परवाना अद्ययावत करुन घ्यावा. तसेच कापूस बियाणे विक्रीकरीता नवीन परवान्यासाठी अर्ज करावा.

सदरचा अर्ज स्वत: किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (C.S.C.) यांचेमार्फत अर्ज करावा. आपल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना आपले सरकार वेब पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र (स्कॅन करुन अपलोड करणे),
आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईजचा फोटो, कागदावर केलेल्या स्वाक्षरीचा नमुना, जागेचे कागदपत्र (८-अ खाते उतारा), जागा मालकाचे संमतीपत्र, जागा भाड्याची असल्यास ५ वर्षाचा करारनामा, ना हरकत दाखला (म.न.पा., न.पा, न.प.,ग्रामपंचायत), शैक्षणिक दाखले, ऑनलाईन ग्रास प्रणालीद्वारे भरलेल्या चलनाची प्रत, जीएसटी क्रमांक, अक्षांक्ष व रेखांक्ष (विक्री व साठवणूक स्थळाचे), बियाणे व खत परवाना (जुन्या परवानाधारकांसाठी), डी.आय.सी. प्रमाणपत्र (उद्यम आधार प्रमाणपत्र), शॉप ॲक्ट परवाना, पार्टनरशिप फर्म असल्यास भागीदारी पत्रक व भागीदारकांचे आधार व पॅनकार्ड इत्यादी.
जिल्हयातील सर्व कृषि केंद्रानी आपले परवाने आपले सरकार या वेब पोर्टलवरुन 30 एप्रिल 2022 पुर्वी अद्ययावत करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्राची ७ जिल्ह्यांची युवा संसद उत्साहात, विजयी स्पर्धक राज्यस्तरीयसाठी पात्र

Next Post

सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन

Next Post

सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo