Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात प्रहार लढवणार विधानसभा निवडणूक

जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती : ९ ऑगस्ट रोजी संभाजीनगरला आंदोलन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात प्रहार लढवणार विधानसभा निवडणूक

 

जळगाव, दि.२१ – प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ.बच्चू कडू हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात लवकरच आपली भुमिका जाहीर करणार आहेत. त्यानुसार प्रहार पक्षाकडून जळगाव जिल्ह्यात रावेर-यावल विधानसभा, भुसावळ मतदार संघातून उमेदवारी लढवली जाणार आहे, तसेच जळगाव शहराचा देखील अभ्यास केला जाणार असल्याची माहिती पक्षाचे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

रविवारी पद्मालय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटना प्रहार जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी, महानगराध्यक्ष प्रविण पाटील, राजेंद्र कुंवर, महानगर महिला आघाडीच्या निता राणे, युवक तालुका अध्यक्ष सतीश सपकाळे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र सपकाळे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष निलेश सूर्यवंशी, पंकज पवार, अजय बनसोडे, ओम देशमुख, शुभम पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बोलताना संभाजी सोनवणे म्हणाले की, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ.बच्चू कडू, प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पधाधिकाऱ्यांची नुकतेच संभाजीनगर येथे बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात तीन जागा लढवणार
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रहारची लढाई जागांवर नव्हे तर मुद्यांवर होणार असल्याचे आ.बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेचे चित्र स्पष्ट झाल्यावर जळगाव जिल्ह्यातून किमान २ जागा लढवण्यात येणार आहे. त्यात रावेर-यावल, भुसावळ हे जवळपास निश्चित असून जळगाव शहराचा अभ्यास करून ठरवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी मेळावा, बुथ नियोजन, मतदार संघात भेटी सुरु करण्यात आल्या आहेत. रावेर-यावल मतदार संघातून प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी हे उमेदवार असणार आहेत तर भुसावळ आणि जळगावसाठी प्रभावी उमेदवाराचा शोध सुरू आहे.

 

९ ऑगस्टला भव्य आंदोलन
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे क्रांती दिवस दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी संभाजीनगर येथे शेतकरी, दिव्यांग, महिला, तरुण, वृद्धांच्या विविध मागण्यांसाठी भव्य आंदोलन पुकारण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी असलेल्या आंदोलनाला दीड लाख समर्थकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे. आंदोलनानंतर पक्षप्रमुख आ.बच्चू कडू हे सर्वांना मार्गदर्शन करणार असून आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी सोनवणे यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुख्यमंत्री वयोश्री योजना” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान आरोग्य तपासणी शिबीर

Next Post

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा

Next Post
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d