Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव येथील अन्न प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्तांना प्रशिक्षणाची गरज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2019
in माहितीचा अधिकार २००५
Reading Time: 1 min read
कुरंगी वाळू ठेकेदाराकडून वाळू वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन?  महसूल विभागाचा पाठिंबा?  माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती अपुर्ण व दिशाभूल करणारी

अन्न प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त यांना माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्याचे ज्ञान नसल्याने त्यांना या कायद्याच्या प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे

जळगाव-(प्रतिनिधी)-येथील अन्न प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त तथा माहिती अधिकारी यांना माहिती अधिकार अधिनियम -२००५ या कायद्याचे प्रशिक्षण घेण्याची गरज असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.


सविस्तर असे कि जळगाव येथील माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ते दिपक सपकाळे यांनी अन्न प्रशासन विभाग,डॉ .बाबासाहेब आंबेडकर मार्केट ,जळगाव यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ नुसार अर्ज करून जळगाव बस स्टॅन्ड रोड वरील “मणियार होलसेल” या सुपर शॉप ने परवाना घेण्यासाठी सादर केलेले कागदपत्र बाबत माहिती मागितली होती. यावर सन्माननीय सहाय्यक आयुक्त तथा माहिती अधिकारी यांनी संबंधित मणियार होलसेल यांच्या मालकाशी संपर्क साधून माहिती द्यायची कि नाही ? असे लेखी विचारून घेतले .यावर मणियार होलसेल चे मालक यांनी आक्षेप घेतल्याने , सहाय्यक आयुक्त तथा माहिती अधिकारी अन्न प्रशासन विभाग यांनी अर्जदार यांना पत्र पाठवले कि
सदर माहिती देता येणार नाही कारण ज्यांच्याशी माहिती संबंधित आहे त्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे.


प्रश्न असा निर्माण होतो कि ,सदर माहिती अधिकार अर्जातील माहिती हि , संबंधित मणियार होलसेल यांच्या कुठल्याही खाजगी हितसंबंधाशी संबंधित नाही. एखाद्या व्यवसाय धारकाने परवानगी साठी सादर केलेले कागदपत्र हे पूर्ण पणे शासकीय होत असतात व शासकीय कागदपत्र हे सार्वजनिक दस्तऐवज आहे. मग हि माहिती दडवण्याचे नेमके कारण काय ?

माहिती अधिकाऱ्यांना एवढे तरी नक्की माहिती असायला हवे कि सार्वजनिक दस्तऐवज म्हणजे नेमके काय ? तसेच अन्न विभागाकडून बऱ्याच वेळा तक्रारदारांच्या तक्रारी वरून कारवाई करण्यात येते त्यात काही तथ्य आहे किंवा नाही हि माहिती देखील गोपनीय ठेवण्यात येते. जनतेला का माहिती पडू दिल्या जात नाहीत कि कोणत्या मिठाईच्या कारखान्यावरून नमुने घेतले आहेत व त्यात काय निकाल आला आहे. १०० % तर गोपनीयता बाळगल्या जात आहे या कार्यालयात मग हे कार्यालय सार्वजनिक कसे ? या अशा घटनांमुळेच या विभागातील अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. नेमके काम करताय कुणासाठी? शासनाचा पगार घेऊन शासनाच्या नियमाचे पालन केले पाहिजे तर त्यात पळवाटा काढत असतात. माहिती न मिळाल्यामुळे अर्जदार यांनी प्रथम अपील अधिकारी अन्न प्रशासन नासिक यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले होते . त्यांनी देखील जनमाहिती अधिकारी यांच्या निर्णय कायम ठेवत माहिती देण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे मा.प्रथम अपील अधिकारी यांना देखील माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्याचे पूर्णपणे ज्ञान नसल्याचे लक्षात येते.


याबाबत अर्जदार द्वितीय अपील दाखल करणार आहेच. पण अशा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना या कायद्याचे पूर्ण ज्ञान नसल्याने अर्जदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो व द्वितीय अपिलाचा निर्णय लागेपर्यंत ताटकळत राहावे लागते. मुळात अन्न प्रशासन विभाग फक्त थातुर मातुर कारवाईत धन्यता मानतात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्यामंदिर येथे राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा

Next Post

जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम निकृष्ठ दर्जाचे

Next Post

जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम निकृष्ठ दर्जाचे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo