Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव येथे अधिकृत ३३व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

आसाम येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड

Desk Team by Desk Team
17/08/2023
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव येथे अधिकृत ३३व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

आसाम येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड

जळगाव येथे अधिकृत ३३व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजनआसाम येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार महाराष्ट्रातील खेळाडूंची निवडजळगाव दि.17 प्रतिनिधी- तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या एकमेव अधिकृत राज्य संघटनेकडून आयोजित अधिकृत ३३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धा दिनांक २२ व २३ ऑगस्ट २०२३ दरम्यान जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेते खेळाडू आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी निवडले जाणार असल्याने या राज्य स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, अशी माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या एकमेव राष्ट्रीय खेळ संघटनेस इंडियन ऑलिंपिक असोसिएशन (IOA) व भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिलेली असून महाराष्ट्रामध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही अधिकृत संघटना जळगाव येथे राज्य स्पर्धेचे आयोजन करत आहे. अधिकृत राज्य संघटनेच्या बॅनरखाली जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या मदतीने जळगाव येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल जळगाव येथे 3३ व्या महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषांच्या ८ व महिलांच्या ८ वजनी गटांमध्ये या स्पर्धा जागतिक संघटनेच्या नवीन नियमानुसार सेंसर वर पार पडणार आहेत. क्योरोगी व पुंमसे या दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडतील. फ्री स्टाइल पुंमसे चा देखील समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक संघटनेच्या नवीन नियमासह नव्याने राष्ट्रीय पंच परीक्षा व रिफ्रेशर सेमिनार उत्तीर्ण राष्ट्रीय पंचांच्या मदतीने या स्पर्धा पार पडतील. सर्व वजन गटातील सुवर्णपदक विजेते खेळाडू ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, शिवाय यावर्षी गोवा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला दोन्ही संघ पात्र करणे हे खेळाडूंची प्राथमिकता असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित खेळाडू व प्रशिक्षक यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच अधिकृत जिल्हा संघटना आपल्या निवड झालेल्या खेळाडूंची प्रथमच नोंदणी करणार असून यामुळे राज्य संघटना आता नवनवीन आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान अवगत करत आहे. राज्य संघटनेचे पदाधिकारी असलेले अजित घारगे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी,यांच्यावर राज्य स्पर्धेची जबाबदारी देण्यात आली आहे. खेळाडूंसाठी नेहमीच पाठबळ देणारी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही अधिकृत संघटना राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा खेळाडूंचा प्रवेश शुल्क, प्रवास भाडे, किट आदी सुविधा खेळाडूंना नेहमी प्रमाणेच राज्य संघटनेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर देखील आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती तायक्वांदो. असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, व्यंकटेश कररा, महासचिव मिलिंद पठारे, अजित घारगे, शाम खेमसकर, निरज बोरसे आदींनी माहिती दिली
आसाम येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड

जळगाव दि.17 प्रतिनिधी- तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या एकमेव अधिकृत राज्य संघटनेकडून आयोजित अधिकृत ३३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धा दिनांक २२ व २३ ऑगस्ट २०२३ दरम्यान जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेते खेळाडू आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी निवडले जाणार असल्याने या राज्य स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, अशी माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या एकमेव राष्ट्रीय खेळ संघटनेस इंडियन ऑलिंपिक असोसिएशन (IOA) व भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिलेली असून महाराष्ट्रामध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही अधिकृत संघटना जळगाव येथे राज्य स्पर्धेचे आयोजन करत आहे. अधिकृत राज्य संघटनेच्या बॅनरखाली जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या मदतीने जळगाव येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल जळगाव येथे 3३ व्या महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषांच्या ८ व महिलांच्या ८ वजनी गटांमध्ये या स्पर्धा जागतिक संघटनेच्या नवीन नियमानुसार सेंसर वर पार पडणार आहेत. क्योरोगी व पुंमसे या दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडतील. फ्री स्टाइल पुंमसे चा देखील समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक संघटनेच्या नवीन नियमासह नव्याने राष्ट्रीय पंच परीक्षा व रिफ्रेशर सेमिनार उत्तीर्ण राष्ट्रीय पंचांच्या मदतीने या स्पर्धा पार पडतील. सर्व वजन गटातील सुवर्णपदक विजेते खेळाडू ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, शिवाय यावर्षी गोवा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला दोन्ही संघ पात्र करणे हे खेळाडूंची प्राथमिकता असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित खेळाडू व प्रशिक्षक यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच अधिकृत जिल्हा संघटना आपल्या निवड झालेल्या खेळाडूंची प्रथमच नोंदणी करणार असून यामुळे राज्य संघटना आता नवनवीन आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान अवगत करत आहे. राज्य संघटनेचे पदाधिकारी असलेले अजित घारगे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी,यांच्यावर राज्य स्पर्धेची जबाबदारी देण्यात आली आहे.
खेळाडूंसाठी नेहमीच पाठबळ देणारी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही अधिकृत संघटना राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा खेळाडूंचा प्रवेश शुल्क, प्रवास भाडे, किट आदी सुविधा खेळाडूंना नेहमी प्रमाणेच राज्य संघटनेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर देखील आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती तायक्वांदो. असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, व्यंकटेश कररा, महासचिव मिलिंद पठारे, अजित घारगे, शाम खेमसकर, निरज बोरसे आदींनी माहिती दिली

Desk Team

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यस्तरीय “रत्नागिरी कॅरम लीग” स्पर्धेत सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन सुप्रीमोस संघ तृतीय

Next Post

मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

Next Post
मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d