Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरीय “रत्नागिरी कॅरम लीग” स्पर्धेत सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन सुप्रीमोस संघ तृतीय

राज्यस्तरीय "रत्नागिरी कॅरम लीग" स्पर्धेत सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन सुप्रीमोस संघ तृतीय

Desk Team by Desk Team
17/08/2023
in क्रीडा, जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

राज्यस्तरीय “रत्नागिरी कॅरम लीग” स्पर्धेत सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन सुप्रीमोस संघ तृतीय

 राज्यस्तरीय "रत्नागिरी कॅरम लीग" स्पर्धेत सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन  सुप्रीमोस संघ तृतीय

तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या शुभहस्ते स्वीकारताना जैन इरिगेशन सुप्रीमोस संघाचे श्री. किरण धेंडे, पंकज पवार, निसार शेख, कर्णधार झैद अहमद सय्यद मोहसीन व आयशा खान.

जळगाव दि.17 प्रतिनिधी – रत्नागिरी येथील नामदार उदय सामंत फाउंडेशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन तसेच रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय रत्नागिरी कॅरम लीग या स्पर्धेच्या सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन सुप्रीमोस ह्या संघाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करताना तृतीय क्रमांक पटकाविले. जैन सुप्रीमोस संघाला रोख रुपये एक लाख वीस हजार व आकर्षक असे चषक पारितोषिक स्वरूपात प्राप्त झाले. सदर संघात कर्णधार म्हणून ठाण्याचा जैद फारुकी, उपकर्णधार पंकज पवार तसेच धुळे चा निसार शेख, पुणे चा किरण धेंडे आणि जळगावची आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू आईशा खान यांचा समावेश होता. तसेच संघाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून जळगावचे राष्ट्रीय कॅरम खेळाडू सय्यद मोहसिन यांची निवड करण्यात आली होती. सदर संघाने साखळी फेरीत सात पैकी पाच सामने जिंकून एकूण दहा गुणांची कमाई केली. ह्या स्पर्धेत अव्वल चारही संघांचे एकूण दहा गुण होते. परंतु गुण आणि सेट यांच्या सरासरी नुसार जैन सुप्रीम संघाला अंतिम चौघात चौथे स्थान प्राप्त झाले होते. यानंतर जैन सुप्रीमोस संघाने एलिमिनेटर राउंड मध्ये *कॅरम लवर्स* ह्या रत्नागिरीच्या संघास २-१ ने पराभूत करून क्वालिफायर-२ साठी आपले स्थान निश्चित करून स्पर्धेतील तिसरे क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. क्वालिफायर-२ च्या सामन्यात जैन सुप्रीमोस संघाला मुंबईच्या शिवगर्जना संघाविरुद्ध एक दोन ने पराभव स्वीकारावा लागला.
जैन सुप्रीमोज संघाच्या या यशस्वी कामगिरीवर त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, मोहम्मद फजल तसेच राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान व इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
*फोटो कॅप्शन*
तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या शुभहस्ते स्वीकारताना जैन इरिगेशन सुप्रीमोस संघाचे श्री. किरण धेंडे, पंकज पवार, निसार शेख, कर्णधार झैद अहमद सय्यद मोहसीन व आयशा खान.

Desk Team

Previous Post

अनुभूती निवासी स्कूल येथे ध्वजारोहण

Next Post

जळगाव येथे अधिकृत ३३व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

Next Post

जळगाव येथे अधिकृत ३३व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo