Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव समाज कल्याण कार्यालयाचा भोंगळ कारभार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/08/2019
in माहितीचा अधिकार २००५
Reading Time: 1 min read

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील झोपेत स्वाक्षऱ्या करतात की काय?

जळगांव (प्रतिनिधी):- माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ता दिपक सपकाळे यांनी १० जून २०१९ रोजी माहिती अधिकार अधिनियन २००५ नुसार जळगांव समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. जो अर्ज १७ जुलै २०१९ रोजी जनमाहिती अधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगांव येथे प्राप्त झाला होता. प्रश्न असा ही निर्माण होत आहे की तब्बल एक महिना हा अर्ज नेमका होता कुठे? तसेच सदर प्राप्त अर्जाची दखल पुढील येणाऱ्या संभाव्य तारखेस घेणे अपेक्षित असतांना, मात्र या कार्यालयातून दिपक सपकाळे यांना प्राप्त पत्रात १४ जुलै २०१९ रोजी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत येऊन हजर राहुन माहितीचे अवलोकन करून घेणे व माहीती प्राप्त करून घेण्याचे सुचवलेले आहे. आणि तरीही समाधान नाही झाल्यास पुढील अपिलीय अधिकारी नाशिक यांच्याकडे तरतुदीनुसार अपिल करण्याचा सल्ला दिला आहे.

अर्जदारास माहिती उपलब्ध करुन घेण्याची संभाव्य तारीख ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येणे अपेक्षित असतांना, सदर अर्जाची माहिती ही १४ जुलै २०१९ ला प्राप्त करून घेण्यासाठी पत्राद्वारे कळविले आहे. पण १४ जुलै २०१९ हि तारिख निघुन गेली असल्याने मुळ अर्जातील माहिती नेमकी कशी प्राप्त करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष हे पत्र ९ ऑगस्ट २०१९ रोजीचे पत्र दिपक सपकाळे यांच्या कडे दिनांक १० अॉगस्ट २०१९ रोजी ईमेलद्वारे प्राप्त झाले आहे. सदर पत्रावर समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांची स्वाक्षरी आहे. यावरून प्रश्न निर्माण होतो की साहेब झोपेत तर स्वाक्षऱ्या करत नाहीत ना? की कामाच्या अती जास्त वर्कलोडमुळे तर असे होत नाही ना? कारण काही असले तरी एखाद्या जबाबदार मोठ्या हुद्द्यावर असलेल्या अधिकार्‍याने असे डोळेझाक करुन स्वाक्षरी करणे बेजबाबदार पणाचे लक्षण असल्याचे बोलले जात आहे.
यापुर्वी देखील असाच तारंखाचा घोळ सदर कार्यालयाने केला आहे. अर्जदाराने सांगितले की, कितीवेळा या कार्यालयाच्या अशा चुकांच्या बाबतीत काना डोळा करायचा.
वरिल सर्व बाबींचा विचार करता असे दिसून येते की, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव या कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्याविषयी मोठ्या प्रमाणात उदासीनता व अज्ञान मोठ्या प्रमाणात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळके येथे इंटरनेट सेवा बंद;बीएसएनएल चे दुर्लक्ष

Next Post

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यास लाभ मिळण्यास जागृत जनमंच चा लढा – शिवराम पाटील

Next Post

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यास लाभ मिळण्यास जागृत जनमंच चा लढा - शिवराम पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d