Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जसं मला सांभाळलं तसं उद्धवला व आदित्यला सांभाळा; ठाकरे गटाकडून मालेगावात भावनिक आवाहन

Desk Team by Desk Team
26/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात सभा होत आहे. या सभेपूर्वी मालेगावात लावण्यात आलेले एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


March 26, 2023
नाशिक: नाशिकजिल्ह्यातील मालेगाव शहरात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे . सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे उर्दूतील बॅनर जोरात चर्चेत आलेले असताना दुसरीकडे मालेगावात ठाकरे गटाने लावलेला एक बॅनर अधिक चर्चेत आला आहे. या बॅनरवर ‘जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा’, असा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान मालेगावात होणारी सभा एक ना अनेक कारणांमुळे चर्चेत येत असताना आता पुन्हा, ‘जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवल व आदित्यला सांभाळा’, असा आशयाचा बॅनर लावल्याने हा सभेचा बॅनर अधिक चर्चेत आला आहे. मालेगाव शहरात ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या सभेपासून साधारणत: अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या महात्मा फुले चौकात हा बॅनर लावण्यात आलेला आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या सभेत केलेल्या भाषणात शिवसैनिकांना आवाहन केले होते. ‘जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा’, हे बाळासाहेबांचे शब्द मालेगावात लावलेल्या बॅनरवर झळकत आहेत. या माध्यमातून ठाकरे गटाने भावनिक आवाहन केले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे .
या बॅनरवर प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते बाळासाहेब ठाकरे ,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत.
दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले असून त्यांचे ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुखांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे नाशिकच्या ओझर विमानतळावरून आपल्या वाहनांनी मालेगावच्या दिशेने निघाले आहेत मालेगावात सायंकाळी सभा होणार असून सभेकडे उद्धव ठाकरे नाशिकहून रवाना झाले आहेत.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची प्रथमच सभा मालेगाव मध्ये होत आहे त्यामुळे या सभेसाठी नाशिक व मालेगाव मधूनच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून शिवसैनिक येणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या नेत्यांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Desk Team

Previous Post

केवळ पीएच.डी.साठी संशोधन करू नका प्रा. वासुदेव मुलाटे यांचे प्रतिपादन

Next Post

एकाच गावात तीन विवाह होत असताना त्यापैकी दोन बालविवाह… जळगाव चाइल्ड लाईन ने केली कार्यवाही

Next Post

एकाच गावात तीन विवाह होत असताना त्यापैकी दोन बालविवाह… जळगाव चाइल्ड लाईन ने केली कार्यवाही

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo