Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक एड्स डे निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/12/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जागतिक एड्स डे निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना

जळगाव-(प्रतिनिधी) – जागतिक एड्स डेच्या निमित्ताने गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (छडड), मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभाग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभाग, यूथ रेड क्रॉस आणि रेड रिबिन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृतीसाठी, बाबत स्किट सादरीकरण केले, आकर्षक पोस्टर प्रदर्शन आणि रांगोळी काढून आपले सर्जनशील कौशल्य दाखवले.

कार्यक्रमात प्राचार्य विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांना जागतिक एड्स डेच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक (मेडिकल सुपरिंटेंडेंट) प्रेमचंद पंडित , दिपाली पाटील, प्रतिभा चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी प्रा. अश्विनी वैद्य, प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. निम्मी वर्गीस, प्रा. डॉ. प्रियदर्शनी मून आणि प्रा. निर्भय मोहोड , शिक्षक वृंद यांचीही विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना एड्ससंदर्भात जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय, आणि त्यासंबंधीच्या शासकीय योजनांची सखोल माहिती देण्यात आली.

रेड रिबिन क्लबच्या माध्यमातून भविष्यात एड्सशी संबंधित जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि समाजहिताच्या दृष्टीने उपयुक्त ठरला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहाद्याच्या शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना दिले स्वेटर भेट…

Next Post

जिल्हास्तरीय युवा महोत्सव, विज्ञान मेळाव्यात दिसली विद्यार्थ्यांची प्रगल्भता आणि कलाकारी

Next Post
जिल्हास्तरीय युवा महोत्सव, विज्ञान मेळाव्यात दिसली विद्यार्थ्यांची प्रगल्भता आणि कलाकारी

जिल्हास्तरीय युवा महोत्सव, विज्ञान मेळाव्यात दिसली विद्यार्थ्यांची प्रगल्भता आणि कलाकारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo