Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागर स्त्री शक्तीचा! परिवाराचा मूळ आधारस्तंभ ही स्त्रीच -राजश्री नेवे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
जागर स्त्री शक्तीचा! परिवाराचा मूळ आधारस्तंभ ही स्त्रीच -राजश्री नेवे

जळगांव(चेतन निंबोळकर)- राजश्री उमेश नेवे या सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा असून प्रहार संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला आघाडी प्रमुख आहेत.

स्त्री शक्तीचा जागर मुळात हेच शीर्षक समर्पक आहे. कारण आज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर सुद्धा जागर करावा लागतो, स्वातंत्र्याच्या आधीसुद्धा स्त्री ही महत्त्वपूर्ण होती आणि स्वातंत्र्यानंतर मात्र स्त्रियांनी अनेक यशाची शिखरे पार केली आहेत. परिवाराचा मूळ आधारस्तंभ ही स्त्रीच आहे. असंख्य भूमिका त्या सकाळपासून रात्री झोपे पर्यंत बजावत असतात. त्या फक्त नवरात्रीच्या नऊ भूमिका पार पाडत नाही तर असंख्य, अगणित भूमिका पार पाडत असतात. ज्या परिवारात स्त्री ही सुखी आणि समाधानी असेल तो परिवार सुखी समाधानी इतकंच नव्हे तर तो परिवार सुसंस्कृत असतो.

आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते असं कोणतंही क्षेत्र आज नाही की ज्या ठिकाणी स्त्रीने आपला डंका वाजवला नाही. तरी मात्र दररोज वर्तमान पत्र उघडल्या नंतर ज्यावेळेस स्त्री वर होणाऱ्या अत्याचार, विनयभंगाच्या बातम्या वाचल्या की मन थरकाप होतं. मला सांगायला सुद्धा खंत वाटते की स्त्री हीच स्त्रीची शत्रू आहे. जसे की सासू सुनेचे भांडण! यात आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे की, ज्या परिवारामध्ये माहेरच्या लोकांचा जास्त सहभाग असतो ते घर कधीच टिकू शकत नाही आणि म्हणून जर प्रत्येक सुनेने आपल्या सासर्‍याला आपल्या सासूला आई-वडिलांसह दर्जा दिला तर वृद्धाश्रम राहणार नाही.

आज वृद्ध सासू-सासरे हे तणावात आहेत. जर प्रत्येक सुनेने म्हणजेच प्रत्येक सासू सासऱ्याला जर आपले आई-वडिल समजलं तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. म्हणून हा जागर स्त्रीशक्तीचा जागर, स्त्रियांच्या संस्कृतीचा जागर! स्त्रियांनी बलवान व्हावे यासाठी ही नवरात्र असते. नवरात्रीत देवीचा महिमा वर्णन केलेला आहे तर चला आपण सर्वजण मिळून एक मुखाने एकत्र येऊन शपथ घेऊया भारत मातेची कारण भारताला सुद्धा माताच म्हटलं, आजपासून आपण, आपला परिवार जर आपण आपला परिवार सुधारणा आपल्या परिवाराला लक्ष दिलं तर समाजाकडे लक्ष दिले जाईल. पर्यायाने राज्याकडे लक्ष दिले जाईल. पर्यायाने देशाकडे लक्ष दिले जाईल आणि म्हणून चला करुया सुरुवात आपल्या परीवाराकडुन आजपासून परिवारामध्ये आपल्यामध्ये प्रेम वाटू या प्रेमाने राहूया प्रेमाने जगूया

Team Satymev Jayate

Previous Post

पाळधी येथे महाविकास आघाडीचा बंद यशस्वी

Next Post

जागर स्त्री शक्तीचा! अंगणवाडी सेविकेचे उदात्त कार्य; महिलांचे आरोग्य हेच माझ्यासाठी देवीची आराधना -मीना परदेशी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo