Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जात प्रमाणपत्राबाबत अधिका-यांनी घ्यावयाची काळजी;कार्यशाळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23-  जातीचे प्रमाणपत्र देतांना संबंधीत अधिका-यांनी योग्य ती काळजी घ्यावी. जसा कोणावर अन्याय होणार नाही या दृष्टीकोणातून काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे प्रमाणपत्र देताना योग्य त्या कागदपत्रांची आपण पडताळणी केली आहे किंवा कसे याबाबत अधिका-यांनी जागृत रहावे, असे प्रतिपादन जात पडताळणी समितीचे अध्यक्ष श्री. गुलाबराव खरात यांनी येथे केले. सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हयातील संबंधीत अधिका-यांची कार्यशाळा आज मा.जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालना शेजारील मिटींग हॉल मध्ये झाली.

श्री. गुलाबरावजी खरात अध्यक्षस्थानी होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी  समितीचे उपायुक्त, राकेश पाटील, तसेच जळगांव जिल्हयातील उपविभागीय अधिकारी भुसावळ श्री. रामसिंग सुलाणे उपविभागीय अधिकारी जळगांव श्री. महेश सुधळकर, उपविभागीय अधिकारी एरंडोल विनय गोसावी, उपविभागीय अधिकारी अमळनेर श्रीमती सीमा अहिरे, उपविभागीय अधिकारी चाळीसगांव श्री. लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय अधिकारी पाचोरा, श्री. विक्रम बांदल, उपविभागीय अधिकारी फैजपुर श्री. कैलास कडलग, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राहूल पाटील तसेच त्यांचे कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री.गुलाबराव खरात यांनी अधिका-यांशी संवाद साधला जातीचे प्रमाणपत्र देताना आपण आवश्यक ती जबाबदारी घेतली पाहीजे. जातीचे नावे नावांमधील साधर्म्य कोणत्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. कोणत्या समाजाबददल कागदपत्रांची उपलब्धता नसतांना कोणते दाखले विचारात घ्यावेत. जातीचा उल्लेख अनेकदा शैक्षणीक कागदपत्रात नसतो त्यावेळी कोणत्या कागदपत्रांचा उपयोग करावा. यासह विविध मुद्द्यावर विश्लेषण करण्यात आले.

 सहभागी अधिकारी कर्मचा-यांनी शंकाचे निरसन करुन घेण्याचा प्रयत्न केला. उपायुक्त राकेश पाटील यांनी प्रस्तावीक केले.  तसेच एम. जे. महाविदयालय जळगांव येथे सन 2022-23 या वर्षात इयत्ता 11 वी 12 विज्ञान शाखेच्या विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत श्री. राकेश पाटील, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव यांनी मार्गदर्शन केले तसेच 11 वी 12 वी विज्ञान महाविदयालयाच्या प्राचार्य तसेच कनिष्ठ लिपीक, यांना जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाबाबत उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राकेश पाटील, जळगाव यांनी मार्गदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रेडक्रॉस जळगावच्या सामाजिक कार्याचा महाराष्ट्रातील इतर रेडक्रॉस शाखांनी आदर्श घ्यावा -अशा शब्दांत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांचेकडून रेडक्रॉस जळगावचे कौतुक

Next Post

वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास होतात दुष्परिणाम

Next Post

वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास होतात दुष्परिणाम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo