Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण संयुक्त शोध मोहिमेस सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जामनेर – (प्रतिनिधी) – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.तुषार देशमुख व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीतील संयुक्त क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहिमेला जामनेर तालुक्यात सुरुवात करण्यात आली.
आशा स्वयंसेविका व एक स्वयंसेवक प्रत्येक घरी जाऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करीत आहेत.
या मोहिमेत संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांचा छातीचा एक्स रे,थुंकी तपासणी व इतर आवश्यक तपासणी मोफत करण्यात येतील व निदान झाल्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे.

यासाठी शहरी भागात ४ व ग्रामीण भागात २४८अशा एकूण २५२ टीम नेमण्यात आल्या असून त्यांचे यासंबंधी प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. पर्यवेक्षण करण्यासाठी ५० आरोग्य पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.शहरी भागातील ७०२६ व ग्रामीण भागातील ३१८७० अशा एकूण ३८८९६ नागरिकांची तपासणी या मोहिमेत करण्यात येणार आहे. या मोहिमेत कुटुंबातील सर्व सदस्यांना कुष्ठरोग व क्षयरोग आजाराची माहिती देऊन तपासणी करण्यात येणार आहे.

फिकट लालसर,न दुखणारा,न खाजणार,बधिर चट्टा किंवा दोन आठवळ्यापेक्षा अधिक काळ खोकला, सायंकाळी वाढणारा ताप, वजन कमी होणे,रात्री येणारा तापासोबत घाम,थुंकीवाटे रक्त पडणे,सतत छातीत दुखणे,मानेजवळ लसीका ग्रंथींना सूज व इतर लक्षणे असल्यास नागरिकांनी सर्वेक्षणाच्या वेळी उपस्तीत राहावे.
असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.राजेश जैन,डॉ.मनोज पाटील,डॉ.दानिश खान,डॉ.संदीप कुमावत, डॉ.संदीप पाटील,डॉ.मोहितकुमार जोहरे यांच्याकडून नागरिकांना करण्यात करण्यात आले.मोहिमेसाठी कुष्ठरोग तंत्रद्य ई. पी.भोकरे व क्षयरोग विभागाचे सुयोग महाजन व सलील पटेल परिश्रम घेत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये!

Next Post

आज पासून जिल्हाभरात स्वच्छता ही सेवा मोहिमेचा प्रारंभ

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आज पासून जिल्हाभरात स्वच्छता ही सेवा मोहिमेचा प्रारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo