Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासावी -क्रीडा मंत्री सुनील केदार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासावी -क्रीडा मंत्री सुनील केदार

मुंबई(प्रतिनिधी)- जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी तसेच प्रगतीच्या मार्गावर चालण्याकरिता क्रीडा संस्कृती महत्त्वाची असून ती सर्वांना जोपासावी, असे खेळाडूंचे कौतुक करतांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.किरगिझस्तान येथे आयोजित गामा आशिया चॅम्पियनशिप मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक पटकवल्या बद्दल मंत्रालयात खेळाडूंसाठी अभिनंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यावेळी ते बोलत होते.

क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले, अमेरिका या राष्ट्राने क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याने जगात पदकांच्या तालिकेत अव्वल आहे.तसेच ते राष्ट्र विकसितही आहे.खेळाला महत्त्व देणारे देश विकसित आहेत. यामध्ये जपान, कोरीया यादेशांचे उदाहरण त्यांनी दिले. क्रीडा संस्कृती फक्त पदके जिंकून देते असे नाही तर प्रगतीचा मार्ग दाखवते असे त्यांनी सांगितले.किरगिझस्तान इथे दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित गामा आशिया चॅम्पियनशिप मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत भारताने अभिमानस्पद कामगिरी करुन या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकवला असून एकूण 22 पदके जिंकले आहेत. त्यामध्ये ४ सुवर्ण,७ सिल्व्हर,११ब्राँझ पदकांचा समावेश आहे.

पदके जिंकणारे खेळाडू:- कुमारी अक्षता खडतरे 47.6 किलो वजनी गटात सुवर्ण पदक, कुमारी समता सोनावणे 55.2 किलो वजनी गटात रौप्य पदक, कुमारी सानिका पाटील 56.7 किलो वजनी गटात कास्य पदक, विष्णू वॉरियर 56.7 किलो पुरुष वजनी गटात कास्य पदक, सुमित भयान 70.3 किलो पुरुष वजनी गटात. रौप्य पदक, साहिल दहिया 83.9 किलो पुरुष वजनी गटात, सौ.प्रेक्षा झवेरी – भारतीय टीम मॅनेजर, सु्सोवन घोष – असिस्टंट कोच भारत, जितेंद्र खरे. हेड कोच भारत.याच्यांसह अंतरराष्ट्रीय जज व रेफ्री अँड्रयू कँन्डे, यांचेही श्री केदार यांनी सन्मान पत्र देवून अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Team Satymev Jayate

Previous Post

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे -जिल्हा प्रशासन

Next Post

राजधानीत आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी

Next Post
राजधानीत आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी

राजधानीत आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo