Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा २०२२ चे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/10/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव दि.16- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त)महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा 2022 चे आयोजन दि.18 रोजी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे.त्याची पूर्व तयारी अंतिम टप्प्यात असून या स्पर्धेत एकूण 744 पोस्टर व माॅडेलची नोंदणी झाली आहे. चार टप्प्यात घेण्यात येणारी ही स्पर्धा संशोधनाची आवड निर्माण व्हावी याकरिता राज्यपाल( कुलपती) यांच्या वतीने विद्यापीठ स्तरीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवर होत असते. 
कृषी व पशुसंवर्धन(74), वाणिज्य व्यवस्थापन व विधी(49), अभियांत्रिकी व तंत्रज्ञान(85), सामाजिक शास्त्र, भाषा , मानव्यविद्या, ललित कला (176),औषध निर्माण शास्त्र(87), विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, गणित , पर्यावरण शास्त्र , गृह आणि संगणक शास्त्र) (263) अशा एकूण 744 प्रवेशिका प्राप्त झालेल्या आहेत. येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता त्यांच्या सादरीकरणाकारीता लागणाऱ्या मुलभूत गरजा लक्ष्यात घेऊन सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
                       या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एस.माहेश्वरी यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी केसीई संस्थेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत .पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मूळजी जेठा महाविद्यालयाच्या हॉलीबॉल प्रांगणात होणार असून विविध मॉडेल्सची मांडणी पदार्थ विज्ञान प्रशाळेत करण्यात येणार आहे. या संशोधन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी शिक्षक यांच्या संशोधनाची अधिक माहिती घेण्याकरिता विद्यार्थी व पालकांनी या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा मूळजी जेठा महाविद्यालय परिसराला  भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य संजय भारंबे यांनी केले.या पत्रकार परिषदेला प्राचार्य संजय भारंबे, जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा समन्वयक भूषण कविमंडल व डॉ. मनोज चोपडा आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आंतर महाविद्यालयीन कबड्डी (पुरुष व महिला)२०२२ स्पर्धेत मू. जे. महाविद्यालयाच्या पुरुष संघाला अजिंक्यपद व महिला संघ तृतीय स्थानी

Next Post

प्रा.हरीश नेमाडे यांना पीएच.डी. प्रदान

Next Post

प्रा.हरीश नेमाडे यांना पीएच.डी. प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo