Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज कॕरम स्पर्धा-2022’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


मुलींमध्ये विद्या इंग्लिश स्कूलचे, मुलांमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूलचे वर्चस्व


जळगाव दि. 25 प्रतिनिधी – जैन स्पोर्टस ॲकडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे प्रायोजित जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज कॕरम स्पर्धा-2022’ या स्पर्धेला सुरूवात झाली. कांताई सभागृह येथे कॕरम स्पर्धेचे कॕरम खेळून उद्घाटन झाले.

उद्घाटनाप्रसंगी जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे विजय मोहरील, अनिल जोशी, आंतरराष्ट्रीय कॕरमपटू आयेशा खान, माजी राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे यांच्यासह सर्व सहभागी शाळांचे क्रीडाशिक्षकांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पंधरा शालेय संघातील एकूण 75 खेळाडूंनी सहभाग घेतला.

यात मुलींमध्ये विद्या इंग्लिश स्कूलचे, मुलांमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूलचे वर्चस्व राहिले.
उद्या दि. 26 होणाऱ्या मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामान्यात दुर्गेश्वरी धोंगडे विरूध्द श्रावणी मोरे (दोघंही विद्या इंग्लिश स्कूल), दुसरा उपांत्य सामन्यात पुर्वा भुतडा (विद्या इंग्लिश स्कूल) विरुध्द पुर्वी भावसार (अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी) यांच्या दरम्यान सामना रंगेल. तसेच मुलांच्या उपउपांत्य फेरीत अँग्लो उर्दू हायस्कूलचे तीन खेळाडू, रायसोनी पब्लिक स्कूल व अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरीचे प्रत्येकी दोन खेळाडू आणि सेंट लाॕरेंस हायस्कूलचा एक खेळाडू यांनी प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीचे सामने झाल्यानंतर अंतिम फेरीचे सामने होतील. विजेत्या स्पर्धक व शाळांना जैन चँलेंज चषक व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल. पारितोषिक वितरण समारंभ कांताई सभागृह येथे उद्या दि. 25 ला दुपारी 2 वाजता व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष यूसफ मकरा, महाराष्ट्र कॕरम असोशिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान व जळगाव जिल्हा कॕरम असोसिएशनचे सचिव नितीन बर्डे यांच्या उपस्थिती होईल. सय्यद मोहसीन, आयशा खान, योगेश धोंगडे, सय्यद जुबेर यांनी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आणि स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

DRDO मध्ये हजारो पदांसाठी मोठी भरती, 1 लाखाहून अधिक पगार…

Next Post

जिल्हास्तरीय आंतर शालेय 14 व 17 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धा संपन्न

Next Post

जिल्हास्तरीय आंतर शालेय 14 व 17 वर्ष वयोगटाखालील 'जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo