Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये हर्षल पाटील, गिरीष पाटील यांनी मारली बाजी!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये हर्षल पाटील, गिरीष पाटील यांनी मारली बाजी!

केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून आयोजन : जळगाव, बुलढाणाच्या ६४ स्पर्धकांचा होता सहभाग

जळगाव (जिमाका), दि.२९ – तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे केंद्र शासनाकडून यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून आयोजित जिल्हास्तरीय युवा संसदचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव, बुलढाणा विभागासाठी ऑनलाईन पद्धतीने युवा संसद पार पडली. जळगाव जिल्ह्यातून हर्षल पाटील, गिरीष पाटील तर बुलढाणा विभागातून अभिजीत खोडके आणि सलोनी त्रिवेदी यांनी बाजी मारली.

तरुण, तरुणी, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसीत व्हावे, देशाच्या समाजकारणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर आपली निवड होणे आवश्यक असते. जळगाव, बुलढाणा जिल्ह्याची युवा संसद दि.२८ रोजी ऑनलाईन पध्दतीने पार पडली.

विद्यार्थ्यांनी केले उत्कृष्ट सादरीकरण

जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी ४ मिनीटे वेळ देण्यात आला होता. स्पर्धेसाठी सुचविलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० भारतातील शिक्षणाचे परिवर्तन करेल, उन्नत भारत अभियान – समुदायांची शक्ती मुक्त करणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञान वापरणे, नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था अनलॉक करणे, शेतकर्‍यांसाठी वरदान – शून्य बजेट नैसर्गिक शेती या विषयावर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सादरीकरण केले.

चौघे विद्यार्थी जाणार राज्यस्तरावर

स्पर्धेत जळगाव जिल्हयातून ४२ तर बुलढाणा जिल्ह्यातील २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.पंकजकुमार नन्नवरे, डॉ.राधेश्याम चौधरी, कॅप्टन मोहन कुलकर्णी, डॉ.दिनेश पाटील, विनोद ढगे, दीपक सपकाळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समन्वयक जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर होते. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी अजिंक्य गवळी यांनी मानले तर कार्यक्रमासाठी चेतन वाणी, आकाश धनगर, शाहरुख पिंजारी, रोहन अवचारे यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेतून जळगाव जिल्ह्यातून हर्षल प्रवीण पाटील व गिरीष घनश्याम पाटील आणि बुलढाणा जिल्ह्यातून अभिजीत अनिल खोडके व सलोनी संजय त्रिवेदी यांची निवड करण्यात आली असून ते राज्यस्तरीय स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

राष्ट्रीयस्तरावर लाखोंची बक्षीसे मिळणार

राज्यस्तरीय युवा संसदमधून ३ विद्यार्थी देशस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा दि.१ ते ५ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. राष्ट्रीय युवा संसद दि.१२ आणि १३ जानेवारी रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण, प्रवास भत्ता दिला जाणार असून विजेत्यांना प्रथम बक्षीस २ लाख, द्वितीय १.५ लाख, तृतीय बक्षीस १ लाख असणार आहे. असे नेहरू युवा केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

माननीय राज्यपाल महोदयांकडून डॉ . नरेंद्र ठाकूर सन्मानित !

Next Post

वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे आयोजन

Next Post

वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d