Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा परिषद व मू.जे.महाविद्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांचे 150 वे जयंती वर्ष व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगावचे अमृत महोत्सवी वर्ष या निमित्ताने जिल्हा परिषद, जळगाव आणि मूळजी जेठा महाविद्यालयाचे वादविवाद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत दि.30 सप्टेंबर 2019, सोमवार रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मूळजी जेठा महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना विद्यार्जनासोबत सामाजिक भान आणि व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. त्यांनी विविध विषयांवर वाचन, चिंतन आणि प्रकटीकरण करावे. त्यातून त्यांच्या विचारांची प्रगल्भता वाढावी. त्यांचा विचार आणि कृतीने स्वच्छतेच्या सेवाभावी कार्यात सहभाग वाढावा, हा उद्देश्य सदर स्पर्धेमागे आहे.
या स्पर्धेकरिता 1) प्लास्टिक मुक्त परिसर : माझे प्रयत्न २) ‘स्वच्छता ही सेवा’ मंत्राचे आम्ही पाईक ३) सावध ऐका निसर्गाची हाक असे विषय असणार आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक : ५००१ /- सन्मानचिह्न आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक : ३००१ /- सन्मानचिह्न आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक : २००१ /- सन्मानचिह्न आणि प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ (०२) प्रत्येकी १००१/- आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपाची बक्षिसे देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रो.दिगंबर लोखंडे, पुणे येथील प्रसिद्ध वक्ते डॉ.महेंद्र ठाकुरदास, के.सी.ई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. शशिकांत वडोदकर आणि प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समुपदेशकांच्या पगारावर संस्था चालकांचा डल्ला

Next Post

शिरिष चौधरी यांना रावेर मधुन उमेदवारी

Next Post

शिरिष चौधरी यांना रावेर मधुन उमेदवारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo