Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली वरणगाव येथे भव्य पशु प्रदर्शन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/01/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली वरणगाव येथे भव्य पशु प्रदर्शन संपन्न

जळगाव-( जिमाका )- जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद जळगाव व पंचायत समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे भव्य पशु प्रदर्शन आज संपन्न झाले.
तालुकास्तरीय पशु प्रदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.प्रदीप झोड होते. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दूध सोसायटीचे संचालक अतुल झांबरे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील, डॉ. शामकांत हिरे, डॉ. संजय खाचणे, डॉ. अनिल शिंदे, डॉ. सलीम तडवी उपस्थित होते.
पशु प्रदर्शनाच्या प्रस्ताविकात पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत येवले यांनी सांगितले की, पशुप्रदर्शनाद्वारे ग्रामीण भागातील पशुपालकांना पशुसंवर्धनाविषयी सर्वांगीन माहिती मिळावी व पशुसंवर्धनाबाबत आवड निर्माण होऊन शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पशुपालनाकडे बघण्याची दृष्टी प्राप्त करून घेणे हा या पशुप्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
डॉ वाहेद तडवी यांनी जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत व लसीकरणाबाबत सविस्तर माहिती सांगितली तर दुधाळ जनावरांची निवड कशी करावी. अझोला, हायड्रोपोनिक व बहुवार्षिक चारा पिकाची लागवड, उत्पादन बाबत सविस्तर माहिती नाचणखेडा येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ संदीप पाटील यांनी सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी.डी झोड यांनी जातिवंत सिद्ध वळूच्या रेत मात्रा वापरून कुत्रिम रेतन करावे व राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्यामध्ये उद्योजक बनावे असे आवाहन केले.
या पशु प्रदर्शनामध्ये आलेल्या पशूंचे गट तयार करून पशुसंवर्धन विभागाच्या निवड समितीने निवड करून बक्षीस वाटप करण्यात आले
यावेळी डॉ. आर एस जाधव, डॉ. सलीम तडवी, डॉ. अतुल नेहते, डॉ प्रशांत लोंढे, डॉ संतोष बढे, डॉ. विकास इंगळे, डॉ सतीश तायडे, डॉ हेमंत कुमावत, डॉ निलेश राणे, डॉ योगेश पाटील, डॉ प्रवीण चौधरी, डॉ बर्‍हाटे , डॉ प्रीती पाटील उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ प्रशांत येवले, डॉ. दर्शना उभाड, योगेश पाटील व तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्याचे राज्यपाल सी .पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्हा दौरा

Next Post

मकरसंक्रांतीच्या पर्वावर जळगाव येथे किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन

Next Post
मकरसंक्रांतीच्या पर्वावर जळगाव येथे किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन

मकरसंक्रांतीच्या पर्वावर जळगाव येथे किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo