Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा वार्षिक योजनेतील मागील अपूर्ण कामांच्या पूर्ततेस प्राधान्य द्यावे; जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हा वार्षिक योजनेतील मागील अपूर्ण कामांच्या पूर्ततेस प्राधान्य द्यावे; जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मागील आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेली अपूर्ण कामे (स्पील) पूर्ततेसाठी प्राधान्य देतानाच कार्यान्वयीन यंत्रणांनी राज्य शासनाने जाहीर केलेला ‘आव्हान निधी’ जिल्ह्यास मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 30 सप्टेंबर, 2021 पर्यंत झालेल्या विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आज दुपारी नियोजन भवन सभागृहात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले, की जिल्हा वार्षिक योजनेसाठी चारशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे. आतापर्यंत 176 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यान्वयीन यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन लवकरात लवकर करावे. निधी प्राप्त करून घेण्यासाठी तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. त्याचबरोबर मागील वर्षी अपूर्ण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी दर्जेदार आणि अत्याधुनिक सोयीसुविधा रुग्णांना उपलब्ध होण्यासाठी निधीचे नियोजन करावे. या निधीच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण करावे. जिल्हा नियोजन समितीचे कामकाज I PASS या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सुरू आहे. प्रत्येक कार्यान्वयीन यंत्रणेने या प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना I PASS या संगणकीय प्रणालीची माहिती देत त्यांना प्रशिक्षित करावे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीची मदत घ्यावी. नाशिक विभागातून एका जिल्ह्यास 50 कोटी रुपयांचा ‘आव्हान निधी’ उपलब्ध होणार आहे.

हा निधी जळगाव जिल्ह्यास प्राप्त करून घेण्यासाठी I PASS या संगणकीय प्रणालीसह शासनाच्या नियमानुसार कामाची आवश्यकता, कामाची उपयोगिता, शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेबरोबर शेतकरी हितास प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध निधीची व आतापर्यंत झालेल्या खर्चाची माहिती दिली. तसेच शासकीय यंत्रणांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत, असे सांगितले, तर समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी विशेष घटक योजनेसाठी उपलब्ध निधीची माहिती दिली.

Team Satymev Jayate

Previous Post

विधी अधिकारी पदासाठी अर्ज करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न

Next Post
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo