Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर;35 कोटी 35 लाख नुकसान भरपाई मिळणार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर;35 कोटी 35 लाख नुकसान भरपाई  मिळणार

जळगाव(प्रतिनिधी)- यंदाच्या मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वा-यामुळे बाधीत झालेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून राज्यात सर्वाधिक ३५ कोटी ३५ लाख रूपयांची मदत ही जळगाव जिल्ह्यास जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून लवकरच शेतक-यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य मंत्रीमंडळाच्या १२ मे, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर येथील विभागीय आयुक्तांकडून १२२ कोटी २६ लाख ३० हजार रूपयांच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. या अनुषंगाने आज राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या मदतीच्या रकमेला मंजुरी दिली आहे. यात केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ( एसडीआरएफ) दरानुसार मदत अनुज्ञेय करून सर्व विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या विवरणानुसार ही मदत प्रदान करण्यात येणार असून आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

आजच्या शासन निर्णयातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३५ कोटी ३५ लाख ३१ हजार रूपये इतकी रक्कम ही जळगाव जिल्ह्यास मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यंदा निसर्गाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकर्‍यांना मदत देण्याबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला होता. याची दखल घेऊन जिल्ह्यास भरीव मदत जाहीर करण्यात आली असून याचा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

शासन निर्णयानुसार पीक आणि फळबागांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ होणार आहे. या संदर्भात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांची संयुक्त स्वाक्षरी असणारे पंचनामे ग्राह्य धरून संबंधीत शेतकर्‍यांना ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून थेट जमा करण्यात येणार आहे. प्रशासनाने कोणत्याही प्रकारे शेतकर्‍यांना रोख रक्कम देऊ नये, तसेच बँकांनी यातून कोणत्याही प्रकारची कपात करू नयेत असे स्पष्ट निर्देशही या शासन निर्णयात देण्यात आले आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मार्च ते मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आधीच पंचनामे करण्यात आलेले असून त्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरच मदत मिळणार आहे. याप्रमाणेच अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांनाही राज्य शासनाकडून आपण मदत मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

शिक्षण क्षेत्रात डेक्कन कॉलेजचे महत्त्वपूर्ण योगदान -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post

शकुंतला टोके यांचे दुःखद निधन

Next Post
शकुंतला टोके यांचे दुःखद निधन

शकुंतला टोके यांचे दुःखद निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo