Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात वनाधिकारी होताय धनाधिकारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जिल्ह्यात अवैध वृक्ष तोड वाढली आहे,याला जबाबदार वनविभाग ?

जळगांव-(चेतन निंबोळकर) – जिह्यात अवैध वृक्षतोड जोरात सुरु असुन वनविभागाने याकडे संपुर्ण दुर्लक्ष केले आहे. राञीच्या वेळेस मोठमोठ्या वृक्षांची कत्तल केली जात असुन टेम्पो लावुन लाकडांची तस्करी केली जात आहे. पर्यावरणाचा पुर्णपणे रास झाला असुन जिल्ह्यातील वनराई ठिकाणांचे रुपांतर वाळवंटात झाले आहे. ऐन दुष्काळात लाकडांची तस्करी कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहे, याची चर्चा स्थानिक नागरिक करत आहे.जिल्ह्यात अवैध वृक्षतोड ही वनक्षेत्राच्या मुळावर उठली आहे. खासगी तसेच राखीव वनक्षेत्रात स्वार्थासाठी छुप्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात येते. काही स्थानिक नागरिक व काही वेळा वनविभागाची पडद्यामागची छुपी भ्रष्टाचारी यामुळे ही समस्या ओढवली आहे.  जिल्ह्यात चारही बाजूंनी वनक्षेत्र असल्याने वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून वृक्षतोड होते. इंधन, फर्निचरसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षाची तोड करण्यात येते. जिल्ह्यातील एकूण भागातील जंगलात मोठ्या प्रमाणावर सागाचे वृक्ष आढळतात. डोंगरउतारावरील रचनेमुळे हिवाळ्याच्या उत्तरार्धात व उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. यामध्ये वनसंपत्तीचा ऱ्हास होतो. या मुख्य कारणामुळे वणव्याचे बहुतांशी प्रमाण असलेल्या भागातील नागरिक वृक्ष वणव्याच्या तोंडी पडण्यापेक्षा त्याची तोड करणेच योग्य समजतात. अशा नागरिकांच्या आगळ्या वेगळ्या गैरसमजामुळे आज जिल्ह्यातील बरीचसी जंगले उनाड होण्याच्या मार्गावर आहेत. वनक्षेत्रात स्थानिक लोकांकडून स्वार्थासाठी अशाच घटनांना वाव देण्यात येत आहे. दुसरे कारण म्हणजे वनविभागातील भ्रष्टाचारामुळे जंगलातील वृक्षसंपत्ती आज कमी होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रात अशा घटना मोठ्या प्रमाणात होत असून याकडे वनविभागाचा कानडोळा आहे. यात संबधित परिसरातील काही वनपालापासून बड्या अधिकाऱ्यांपर्यंत हात असण्याचा अंदाज असतो.जिल्ह्यातील साग या वृक्षाला परजिल्ह्यात मोठी मागणी होत असते, मात्र वनविभागाच्या चौक्‍यावर होणारी तपासणी, देण्यात येणारा पास अशा बाबी महत्वाच्या असतात. याचा अडथळा दुर करण्यासाठीही बऱ्याच वेळा लाकुडपती व्यावसायिकांकडून देण्यात येणार्‍या मोठ्या आमिषांना बळी पडल्याचे प्रकार होत असतात. त्यामुळे सत्य परिस्थिती लपविण्यात येते. वनाधिकारी आणि लाकुड व्यावसायिक आर्थिक देवाणघेवाण करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वनाच्छादित क्षेत्र घटण्याचा धोका पर्यावरणाला निर्माण झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ईच्छामरणाची घेतली गेली दखल;अधिकार्‍यांची होणार चौकशी

Next Post

आ.सतीश पाटील यांच्या निधीतून ३ लक्ष विकासकामाचे भूमिपूजन

Next Post

आ.सतीश पाटील यांच्या निधीतून ३ लक्ष विकासकामाचे भूमिपूजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo