Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन दिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन दिवस साजरा

जळगाव, दि. १४ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये १४ एप्रिल २०२३ रोजी अग्रीशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईच्या व्हिक्टोरीया डॉक पोर्ट ट्रस्ट येथे स्फोटक वाहून आणणाऱ्या जहाजाला आग लागली होती. ही आग प्रचंड अशी होती. ती विझविण्याचे कार्य सुरू होते. त्यावेळी मुंबई अग्नीशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात भारत सरकारच्या आदेशानुसार अग्निशमन सेवा दिन व अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. जैन फूड पार्क येथे अग्निशमन दिवस व सप्ताहाच्या निमित्ताने आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य वापराबाबत प्रात्यक्षिकासह माहिती सादर केली जात आहे.

त्याकाळी आग विझविण्यासाठी धारातीर्थी पडलेल्या शहीद अग्निशमन जवानांना कंपनीच्या सहकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी वरिष्ठ अधिकारी सुनील गुप्ता, जी.आर. पाटील, एस.बी. ठाकरे, वाय.जे. पाटील, फायर सेफ्टी विभागाचे सेफ्टी अधिकारी स्वप्निल चौधरी, अमोल पाटील, कैलास सैंदाणे, मनोज पाटील, प्रवीण पाटील, हेमकांत पाटील, सागर बागुल, गणेश मोरे, नितीन चौधरी, जितेंद्र पाटील, आशिष सुतार, महेंद्र पाटील, जे.जे. पाटील आदी सहकारी उपस्थित होते. या दिनाच्या औचित्याने आपल्या अवतीभवती ज्वलनशील पदार्थ असतील तर त्याच्या साठवणुकीचा, सुरक्षिततेचा आढावा व त्याबाबतचे अत्यावश्यक नियोजन करून ठेवावे जेणे करून कुठलाही अपघात अथवा अनिष्ठ घटना घडणार नाही याची काळजी घेण्याबाबत सांगण्यात आले. अपघात होऊ नयेत याबाबत घेतलेली खबरदारी या शहीद अग्निशमन जवानांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. बाबासाहेबांचे विचार कृतीत आणून, समाज उत्थानाचे काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

सामाजीक न्याय विभाग आयोजित “समता-रजनी” कार्यक्रम संभाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात संपन्न

Next Post
सामाजीक न्याय विभाग आयोजित “समता-रजनी” कार्यक्रम संभाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात संपन्न

सामाजीक न्याय विभाग आयोजित "समता-रजनी" कार्यक्रम संभाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo