Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

सुरक्षा सप्ताहानिमित्त सुरक्षा प्रतिज्ञा घेताना जैन व्हॅली परिसरातील सहकारी

जळगाव दि. 4 प्रतिनिधी – जैन इरिगेशनसह कंपनीमधील विविध आस्थापनांमध्ये दि.4 ते 11 दरम्यान सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षा जनजागृतीसाठी निबंध व सेफ्टी स्लोगन स्पर्धेचेही आयोजन केले आहे. जैन व्हॅलीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली. जैन व्हॅली परिसरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी एस. डी. गुप्ता, व्ही. पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सेफ्टी विभागाचे डी. जे शितोळे, मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, कैलास सैंदाणे, योगेश्वर पवार यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून 4 मार्च देशभर साजरा केला जातो. 4 मार्च 1966 रोजी देशात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली होती. देशातील सर्व उद्योग, आस्थापनांमध्ये दि.4 ते 11 मार्च हा आठवडा सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान जैन इरिगेशन सिस्टिम्स ली., जैन फार्मफ्रेश फूड्स लि., जैन हिल्स, जैन व्हॅली, गांधी रिसर्च फाऊंडेशन यासह कंपनीच्या विविध आस्थापनांमध्ये राष्ट्रीय सुरक्षाविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहे. आजच्या दिवशी कंपनीमधील सहकाऱ्यांनी सुरक्षा प्रतिज्ञा घेतली. तसेच या सप्ताहादरम्यान सेफ्टी ट्रेनींग, मॉकड्रील, सेफ्टी सर्वे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

निबंध स्पर्धेचे आयोजन

सुरक्षा विषयक जनजागृती व्हावी म्हणून सेफ्टी विभागातर्फे जैन इरिगेशनच्या आस्थापनांमधील प्रत्येक विभागात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच सेफ्टी स्लोगन हा विषय घेऊनदेखील स्पर्धा घेतली जाणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विकास मल्हारा यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक

Next Post

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

Next Post
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस "ताल सुरन का मेल" या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo