Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्ञानेश्वर इगवे यांनी स्वीकारली नाशिकच्या माहिती उपसंचालक पदाची सुत्रं

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ज्ञानेश्वर इगवे यांनी स्वीकारली नाशिकच्या माहिती उपसंचालक पदाची सुत्रं

नाशिक : दिनांक १३ सप्टेंबर २०२१ (जिमाका वृत्त) नोव्हेंबर २०१६ पासून रिक्त असलेल्या नाशिक विभागीय माहिती उपसंचालक या पदावर ज्ञानेश्वर इगवे यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली असून त्यांनी आज नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्याकडून या पदाची सुत्रं स्वीकारली आहेत.

पदोन्नतीना पदस्थापना झालेले इगवे यापूर्वी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून वृत्तचित्र शाखेत कार्यरत होते.
श्री. इगवे यांनी नासिक येथील यशवंत चव्हाण मुक्तविद्यापीठात दृकश्राव्य केंद्रात सन १९९१ ते २००३ याकाळात आपल्या सेवेची सुरूवात केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात शासनाने सरळ सेवेने सन २००३ साली त्यांची वृत्त चित्र शाखेत वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून नियुक्ती केली.

त्यांनी २००८ ते २०१२ पर्यंत  बीड व २०१२ ते २०१५ पर्यंत धुळे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ते २०१५ पासून मंत्रालयात पुन्हा वरीष्ठ सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होते.
श्री. इगवे हे मुळचे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील  घाटनांदूर येथील असून त्यांचे महाविद्यालयालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे.
त्यांनी राज्यशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे, तसेच वृत्तपत्र विद्या पदवी आणि नाट्यशास्त्र विषयात पदविका संपादन केली आहे.

आज त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्याकडून पदभार स्वीकारला, त्यावेळी सहाय्यक संचालक मोहिनी राणे, माहिती अधिकारी अर्चना देशमुख, उपसंपादक जयश्री कोल्हे, माहिती सहाय्यक किरण डोळस, प्रविण बावा व विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बाप्पा विथ सेल्फी! ओजस पाटील या चिमुकलीने आपल्या लाडक्या बाप्पासाठी घरीच तयार केली मनमोहक आरास

Next Post

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात लावणार हजेरी

Next Post
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात लावणार हजेरी

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात लावणार हजेरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo