Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी ) : कोकणातील पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविणे तसेच कोकणातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोकण विभागाच्या प्रादेशिक पर्यटन कार्यालयामार्फत “ट्रॅव्हल गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील पर्यटनस्थळांबाबतचा इतिहास व सविस्तर माहिती पर्यटकांना मिळावी, तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड, मुरबाड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशा सात ठिकाणी “ट्रॅव्हल गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी किमान १८ वर्षे वयोमार्यादा असून ज्यांचे वय ४० वर्षांच्या आत आहे त्यांनी किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर ज्यांचे वय ४० वर्षांच्या वर आहे त्यांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर भेट देऊन दि. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन (Indian Institute of Tourism and Travel Management)  संस्थेच्या सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा याबाबत उपाययोजना, पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा, पर्यटकांशी संवाद साधताना पर्यटन स्‍थळांबाबतची माहिती गोष्टरुपाने कशी मांडावी, असे विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी तज्ञांमार्फत प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसांचा असून, हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे “टूर गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल. या प्रशिक्षणाद्वारे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे मान्यताप्राप्त “टूर गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) बनण्यासाठीच्या सुवर्णसंधीचा कोकणातील स्थानिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभाग पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत कृ. हेडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उन्नतीसाठी स्वतः स्त्रीने क्रांती केली पाहिजे -राजश्री पाटील

Next Post

काही भाग तुपाशी उर्वरित भाग उपाशी; राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीने महापौरांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo