Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. अविनाशजी आचार्यांना देणार ‘जळगाव रत्न’ महापौर जयश्री महाजन यांनी स्मृतिदिनानिमित्त वाहिली आदरांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. अविनाशजी आचार्यांना देणार ‘जळगाव रत्न’ महापौर जयश्री महाजन यांनी स्मृतिदिनानिमित्त वाहिली आदरांजली


जळगाव, ता. 25: सर्व समाजाला सोबत घेऊन चालत जाणारे, समाजावर निःस्वार्थ प्रेम करणारे, जवानांप्रती सदैव कृतज्ञ राहणारे पूज्य डॉ. अविनाशजी आचार्य ऊर्फ दादा यांचा सातवा स्मृतिदिन आज (25 मार्च 2021) डॉ. हुजूरबाजार हॉस्पिटलमध्ये अतिशय भावनिक वातावरणात साजरा झाला. यावेळी डॉ. आचार्य यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.


याप्रसंगी डॉ. संजीव हुजूरबाजार, डॉ. आरती हुजूरबाजार, शिवम हुजूरबाजार, ऐश्वर्या हुजूरबाजार यांच्यासह महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, उपमहापौर कुलभूषण पाटील, ललित धांडे आदी उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, की पूज्य दादांच्या कार्याची ओळख ही पिढ्यान्पिढ्या समाजातील प्रत्येक घटकासाठी निरंतर प्रेरणादायी राहणारी आहे. दादांनी समाजाची सेवा करण्याची कृतिशील भगवद्गीताच जणू लिहून ठेवलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शक पथावर निरंतर कार्य करणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल. आम्ही सर्व समाजसेवक या कृतीसाठी वचनबद्ध आहोत. सद्यःस्थितीतील ‘कोरोना’चा संक्रमणकाळ संपल्यानंतर जळगाव शहर महानगरपालिका व समस्त जळगावकरांच्या वतीने पूज्य दादांना ‘जळगाव रत्न’ पुरस्कार देऊन आम्ही सर्वजण निश्चितपणे कृतार्थ होऊ.
‘जळगाव रत्न’ पुरस्कारासंदर्भातील पत्र यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी डॉ. हुजूरबाजार यांच्याकडे सुपूर्द केले.

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनाही गौरविणार


ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनाही ‘जळगाव रत्न’ पुरस्कार देण्यासंदर्भात जळगाव महानगरपालिकेने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचाही यथोचित सन्मान ‘कोरोना’चा संक्रमणकाळ संपल्यानंतर केला जाईल, असेही याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तांदुळवाडी , अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात

Next Post

शिक्षणक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विद्यापीठ अनुदान आयोग(UGC),दिल्ली यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन देऊन केली चर्चा

Next Post

शिक्षणक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विद्यापीठ अनुदान आयोग(UGC),दिल्ली यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन देऊन केली चर्चा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo