Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयात जागतिक फिजीओथेरपी दिनानिमित्‍त विविध कार्यक्रम साजरे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयात जागतिक फिजीओथेरपी दिनानिमित्‍त विविध कार्यक्रम साजरे

जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे बुधवार, ८ सप्टेंबर रोजी जागतिक फिजीओथेरपी दिनानिमित्‍त विविध कार्यक्रम घेण्यात आले, यावेळी विविध आजारांवर फिजीओथेरपी कशी उपयुक्‍त आहे, याचे महत्व पटवून देण्यात आले असून त्याबद्दल ७५ रुग्णांना फिजीओथेरपी देण्यात आली.

जागतिक फिजीओथेरपी दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे डॉ.उल्हास पाटील रक्‍तपेढी येथे रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, डॉ.निखील पाटील, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी यांच्यासह ३२ विद्यार्थ्यांनी रक्‍तदान केले. तसेच बुधवार, ८ रोजी सकाळी १० वाजता डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भौतिकोपचाराबाबत मार्गदर्शन आणि उपचारांची माहिती देण्यात आली. सर्वप्रथम एमओ डॉ.चेतन अग्निहोत्री यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले, तसेच तेथील सर्व स्टाफचेही गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर यांनी भौतिकोपचाराबाबत उपस्थीतांना माहिती दिली.

तसेच ज्यांना शारिरीक व्याधी आहे ज्या फिजीओथेरपीने बर्‍या होवू शकतात अशा ७५ रुग्णांना थेरपी देण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी, डॉ.अमित जयस्वाल, डॉ.साकीब सैय्यद, डॉ.अनुराग मेहता, डॉ.मुकेश शिंदे, डॉ.भवानी राणा, डॉ.श्रृती चौधरी, डॉ.प्रज्ञा महाजन हे उपस्थीत होते. यावेळी डॉ.केतकी सकळकर, डॉ.तेजस्विनी व्यंकटवार, इंटर्न श्रृती चौधरी, मैथिली महाजन, श्रृती मुकूंद, राजश्री पाटील आदिंनी थेरपी दिली.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात मार्गदर्शन:- जळगाव येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात जागतिक फिजीओथेरपी दिनानिमित्‍त डॉ.निखील पाटील यांनी फिजीओथेरपीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.निखील पाटील, डॉ.वैशाली, कुणाल सावंत, चिन्मय वाणी, स्नेहा तिवारी, उत्कर्ष यांचा डीडीआरसीतर्फे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेमन, विनोद बियाणी, समाज कल्याणचे भारत चौधरी, डीडीआरसीचे गणेशकर आदि उपस्थीत होते. यावेळी केंद्रातील दिव्यांगांना फिजीओथेरपीचे उपचार देण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

शेतकऱ्यांचे काम झाले सोपे; राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी ॲपला पसंती

Next Post

डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात वेबिनार

Next Post

डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात वेबिनार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo