Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या पंचतज्ञांमूळे हृदयाला छिद्र असूनही सुखरूप प्रसुती बाळ-बाळांतीण सुखरुप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- हृदयाला छिद्र असलेल्या एक चोवीस वर्षीय गभर्र्वतीला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील फिजिशियन, कार्डियोलॉजी, पेडियाट्रिक, पॅथॉलॉजी आणि स्त्रीरोग या पंचतज्ञांमुळे जिवनदान मिळाले असून प्रसृतीनंतर बाळ-बाळांतीण सुखरुप आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आजारांचे तज्ञ डॉक्टर सेवा देत आहे. त्यामुळे अंत्यंत किचकट, गुंतागुंतीच्या, गंभीर आजारातून रुग्णांची यशस्वीपणे सुटका होत असून नातेवाईकांचा जीवही भांड्यात पडतो, अशी प्रचिती नुकतीच प्रसृती झालेली स्मिता (नाव बदललेले) सह तिच्या नातेवाईकांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आली.जळगावनजीक असलेले नेरी-आव्हाना येथील रहिवासी असलेली २४ वर्षीय स्मिता हिची पहिली प्रसृतीही येथेच झाली होती. त्यानंतर दुसर्‍यांदा दिवस राहिल्यावरही त्यांनी डॉ.पाटील रुग्णालयातच प्रसृती करण्याचा निर्णय घेतला, फिजिशियन डॉ.बाचेवार, यांनी रक्‍त,लघवी व इतर तपासण्याचा सल्‍ला दिला. याचबरोबर छाती दुखत असल्याने भुलरोग तज्ञांनी हृदयविकार तज्ञ डॉ.प्रदिप देवकाते यांचा सल्‍ला घेण्यास सांगीतले.

तपासणी अंती गर्भवतीच्या हृदयाला छिद्र असल्याचे लक्षात आले.डॉ. देवकाते यांनी संमती दिली.त्यातच प्रसृतीची घटकाही जवळ आल्याने रुग्ण महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये घेत डॉ.जया शिंदे, डॉ.आकाश डोंगरवार यांनी प्रसृतीला सुरुवात केली,त्यांना भुलतज्ञ डॉ.शीतल ह्यांच्यासह ऑपरेशन थिएटरच्या स्टाफचे सहकार्य लाभले. प्रसृती गुंतागुंतीची होती, त्यामुळे जीवालाही धोका निर्माण झाला होता मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील पंचतज्ञ डॉक्टरांच्या टिमला यश आले आणि बाळ-बाळांतीणीची सुखरुप सुटका झाली. चौकटकिचकट, गुंतागुंतीच्या प्रसृतीही डॉ.पाटील रुग्णालयात यशस्वीडॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग हा अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज आहे. एकाच वेळी ऑपरेशन थिएटरमध्ये पाच प्रसृती होण्याची व्यवस्था आहे.

स्त्रीरोग तज्ञांची टीम २४ तास सज्ज तर आहेच पण याचबरोबर रुग्णालयात फिजीशियन, कार्डियोलॉजिस्ट, पेडियाट्रिक तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजी, ब्लड बँक हे सर्व अर्ध्या मिनीटाच्या अंतरावर उपलब्ध असल्याने रुग्ण कितीही गंंभीर असला तरी कमीत कमी वेळेत तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाची सुखरुप सुटका केली जाते. त्यामुळे अशा रुग्णांना तात्काळ रुग्णालयात आणावे, येथे तज्ञ डॉक्टर रुग्णसेवेसाठी सज्ज असल्याचे स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ.माया आर्विकर यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

गौरव खाटीकला डॉ. सागर गरुड यांच्यावतीने एक लाख अकरा हजार रुपयांची मदत

Next Post

माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्तीचे वाट

Next Post

माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्तीचे वाट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo