Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तऱ्हाडीच्या वृद्धावर म्युकरमायकोसिसची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
तऱ्हाडीच्या वृद्धावर म्युकरमायकोसिसची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पथकाचे यश

जळगाव :मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या एका वयोवृध्दाची म्युकरमायकोसिसची येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी २० जुलै रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिगंभीर अवस्थेत असलेल्या या रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी भेट घेवून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

अमळनेर तालुक्यातील तऱ्हाडी ता. अमळनेर येथील एका ६५ वर्षिय पुरुषाला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा त्रास आहे. या रुग्णास म्युकरमायकोसिस आजाराची बाधा झाली. उपचारासाठी त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सी-२ कक्षात उपचारासाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आले. या ठिकाणी रुग्णाच्या आजाराचे निदान झाल्यानंतर औषधोपचार सुरु करण्यात आले. या रुग्णास महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार मोफत करण्यात आले.

वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची शस्त्रक्रिया मंगळवारी करण्यात आली. मधुमेह असणाऱ्या रुग्णाची शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असते. या सर्व परिस्थितीत रुग्णाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यास वैद्यकीय पथकाच्या टीमला यश आले. दंत शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत यांच्यासह सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, बधिरिकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. किरण सोनवणे, डॉ. सचिन पाटील, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव यांनी महिलेवर शस्त्रक्रिया करण्याकामी परिश्रम घेतले. यासह वार्ड इन्चार्ज परिचारिका नीला जोशी, जोस्त्ना निंबाळकर, नजमा शेख, ओटी असिस्टंट जितेंद्र साबळे, किशोर चांगरे, विवेक मराठे आदींनी सहकार्य केले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शस्त्रक्रिया गृहात भेट देऊन सदर वैद्यकीय पथकाचे कौतुक केले. प्रसंगी म्युकोरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष तथा उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे उपस्थित होते. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा

Next Post

पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपल्या लेखणीची धार अधिक तीव्र करावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post
पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपल्या लेखणीची धार अधिक तीव्र करावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपल्या लेखणीची धार अधिक तीव्र करावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d