Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ती रडली नि आम्ही हसलो– प्रा. आ. केंद्र मोरांबा येथे गुंतागुंतीची यशस्वी प्रसृती संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

तब्बल 4 किलो बाळासह रूंद कटीराची सुखरूप प्रसृती संपन्न.

बाळास कृञिम श्वासोच्छ्वास देऊन जीवनदान

मोरांबा-(प्रतिनिधी) -11 जुलै रोजी रविवारी आज अतिदुर्गम व डोंगराळ भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोरांबा ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे रतनबारा येथील पहिल्या खेपेच्या मातेची गुंतागुंतीची प्रसृती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे व आरोग्य सेविका श्रीमती पी टी वसावे यांनी यशस्वीरित्या सुखरूप पार पाडली.

मातेच्या कटीराची रुंदी कमी असल्याने व बाळ चार किलोचे असल्याने प्रसृतीमार्गात अर्धा तासभर अडकून पडले होते माञ डाॅ प्रमोद सोनवणे व श्रीमती वसावे यांनी युक्तीपुर्वक ( फंडल व इपि इ. )सदर प्रसृती करून स्री-बाळ सुखरूप बाहेर काढले, माञ बाळाने आईच्या पोटात शी केल्याने बाळाने शी गिळून घेतली होती सबब ते रडत नव्हते तरीही बाळाला कृञिम श्वासोच्छ्वास आदी ( Suction, Ambubag Resuscitation,Cardiac massage) सोपस्कार पार पाडत अखेर रडवलेच…!! व प्रसृती कक्षातील आमच्यासह, आशाताई, नातेवाईक या सर्वांच्या चेहर्‍यावर आनंदाश्रू आलेत.

बाळाची व आईची तब्येत आता ठिक असून अशा कठिण प्रसृती करत डोंगराळ भागातील जनतेला उत्तम आरोग्य देण्यासह माता व बाल मृत्यूदर रोखण्यात खारिचा वाटा उचलून मोरांबा आरोग्य केंद्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी प्रतिक्रिया डाॅ सोनवणे यांनी दिली.

यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ नितीन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ स्वप्नील मालखेडे यांचे मार्गदर्शन तर वैद्यकीय अधिकारी डाॅ प्रफुल्ल पठाडे सर, डाॅ योगेश्वर पाटील आदींसह सर्व समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभत आहे असेही डॉ. प्रमोद सोनवणे यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

हिन्दू महासभेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी पियुष तिवारी यांची निवड

Next Post

दिव्या भोसले यांचे जलसंपदा मंञी यांना रिक्त पदे भरण्यासाठी साकडं

Next Post

दिव्या भोसले यांचे जलसंपदा मंञी यांना रिक्त पदे भरण्यासाठी साकडं

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d