Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
हतनूर धरणातून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 75 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार -जिल्हाधिकारी

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी केले आहे.

तृतीय पंथीयांच्या तक्रार निवारणासाठी गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, समितीचे सचिव तथा सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी या बैठकीस उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यावर तृतीयपंथीयांनी नाव नोंदणी करून आपले ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. तृतीयपंथीयांच्या समस्या जिल्हास्तरीय समितीकडे आल्यावर तत्काळ कार्यवाही करावी. या तक्रारी, समस्यांचे विहित कालावधीत निवारण करण्यात यावे. प्राप्त तक्रारींबाबत पडताळणी करून आवश्यकतेनुसार तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाकडे शिफारस करावी.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे. त्यांच्यासाठी लसीकरण शिबिराचे नियोजन करावे. कामाच्या ठिकाणी तृतीयपंथीयांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. सुरुवातीस सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त समाजकल्याण श्री. पाटील यांनी समितीच्या कामकाजाची आणि विषय पत्रिकेची माहिती देऊन आतापर्यंत समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामकाजाचीही माहिती दिली.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

हृदय विकार टाळण्यासाठी धूम्रपानापासून दूर रहावे -अधिष्ठाता; जागतिक हृदय दिनानिमित्त कार्यक्रम

Next Post

जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d