Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हृदय विकार टाळण्यासाठी धूम्रपानापासून दूर रहावे -अधिष्ठाता; जागतिक हृदय दिनानिमित्त कार्यक्रम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
हृदय विकार टाळण्यासाठी धूम्रपानापासून दूर रहावे -अधिष्ठाता; जागतिक हृदय दिनानिमित्त कार्यक्रम

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- बदललेली कार्यशैली आणि धूम्रपानामुळे हृदय विकाराचा धोका बळावतो. तो टाळण्यासाठी नागरिकांनी धूम्रपानापासून दूर राहावे. वेळोवेळी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी केले.जागतिक हृदय दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. नाखले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सी (बाह्य संपर्क), जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संपदा बोराडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण सोनटक्के आदी उपस्थित होते.अधिष्ठाता डॉ. फुलपाटील म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे धूम्रपानापासून प्रत्येकाने दूर रहावे आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले, ताणतणावामुळे हृदय विकाराचा धोका बळावला आहे. तो टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. डॉ. नाखले यांनी हृदय रोग होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी, हृदय विकाराची लक्षणे या विषयावर मार्गदर्शन केले. साथरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या समन्वय डॉ. स्वप्नजा तायडे यांनीही मार्गदर्शन केले. चंद्रशेखर ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

गिरणा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post
हतनूर धरणातून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 75 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार -जिल्हाधिकारी

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo