Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“त्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ अटक करा, अन्यथा वंचित आघाडी तिव्र आंदोलन करणार – विशाल बागुल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

पाचोरा-(प्रतिनिधी)-  तालुक्यातील निपाणे येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्री दलित समाजाच्या महिलेचे जातीचे कारण दाखवत अंत्यसंस्कार करू न दिल्या प्रकरणी दखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असं निवेदन पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल बागुल यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा यांना आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी दिले आहे.

वंचित बहुजन आघाडी पाचोरा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे निपाणे ता. पाचोरा जि. जळगाव येथील सौ. निलाबई धनुर्धर यांचे दि. ११/०९/२०२२ रोजी रात्री निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधी दुसऱ्या दिवशी दि. १२/०९/२०२२ रोजी निपाणे येथे करण्याचे निश्चित झाले होते. निपाणे येथे जिल्हा परिषद जळगाव यांच्या निधीतून सार्वजनिक स्मशान भूमीचे बांधकाम केलेले आहे. दि. १२/०९/२०२२ रोजी पाऊस असल्या कारणाने मयताच्या नातेवाईकांनी सदर स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्याबाबत निर्णय घेतला होता मात्र जि. प. माजी सदस्य व शिवसेना गटप्रमुख तथा एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील उर्फ मनोहर गिरधर पाटील यांनी व सरपंच आणि गावातील १०/११ मराठा समाजाच्या लोकांनी ” हे स्मशानभूमी मराठा समाजासाठी आहे आम्ही बांधलेली आहे. महारांना येथे त्यांची प्रेत जाळता येणार नाही” असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली व सरनावरचे लाकडं ही ढकलून फेकून दिले. तसेच प्रेताचे हेळसांड केली याबाबत वरील संदर्भ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तरी सदर घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून दोन समाजान मध्ये जातीय तेड निर्माण करणारी आहे. म्हणून कुठली कुठल्याही राजकीय दबावाखाली न येता संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे आक्रमक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विश्वकर्मीय समाज पूर्णपणे एकत्र आल्यास विश्व निर्मिती होऊ शकते-ॲड. बाळासाहेब आंबेडकर

Next Post

एल.एल.एम. विधी अभ्यासक्रम परीक्षा मराठीत उपलब्ध व्हावी – मासु जिल्हाध्यक्ष रोहन महाजन

Next Post

एल.एल.एम. विधी अभ्यासक्रम परीक्षा मराठीत उपलब्ध व्हावी - मासु जिल्हाध्यक्ष रोहन महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo