Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा; वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांचे निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा; वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांचे निर्देश

जळगाव-(प्रतिनिधी) – महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात दरमहा वीजबिल वसुलीचे निर्धारीत उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात लक्षणीय फरक आहे. परिणामी आर्थिक वर्षाच्या शेवटी थकबाकीत  होणारी वाढ महावितरणच्या एकूण आर्थिक परिस्थितीला मारक ठरेल.  दरमहा वसुलीचे लक्ष्य त्याच महिन्यात १०० टक्के पुर्ण करणे आवश्यक आहे. वीज बिल थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करा, असे स्पष्ट निर्देश कोकण विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. नाळे यांनी कोकण विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता, सर्व अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले. महावितरणच्या एकूण महसुलात जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणाऱ्या कोकण विभागाच्या वसुलीत दरमहा राहणारी तफावत महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारी आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी वसुली मोहिमेला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करावे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कोकण प्रादेशिक विभागातून फेब्रुवारी-२०२० या महिन्यात वीजबिलाचे २३१७.४७ कोटी रुपये वसूल होणे आवश्यक आहे. मात्र २७ फेब्रुवारीपर्यंत यातील २०५७.८३ कोटी रुपयेच वसूल होऊ शकले. याशिवाय एप्रिल २०१९ पासूनचे ३७० कोटी आणि चालू विजबिलाची उर्वरित रक्कम वसूल होणे अद्याप बाकी आहे. वसुली मोहिमेला गती देऊन ही रक्कम वसूल करण्याचे निर्देश श्री. नाळे यांनी दिले आहेत. तसेच मुख्य कार्यालयाकडून दरमहा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणाऱ्या यादीतील ग्राहकांची वीज प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत खंडित करण्याचे आदेश त्यांनी दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेऊन  नियमानुसार व वेळेत कारवाई पूर्ण करावी, त्याबाबत फेर पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.या बैठकीला मुख्य अभियंते सर्वश्री दीपक कुमठेकर, दिनेश अग्रवाल, ब्रिजपालसिंह जनवीर,  श्रीमती पुष्पा चव्हाण व  रंजना पगारे यांच्यासह कोकण प्रादेशिक विभागातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

के सी ई चे आय एम आर मध्ये आय टी फेस्टा च्या स्पर्धांना सुरवात

Next Post

निखील ठक्कर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

Next Post
निखील ठक्कर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

निखील ठक्कर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo