Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/03/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि. 30 प्रतिनिधी – येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाची विद्यार्थीनी सई अनिल जोशी हिची २ ते ८ एप्रिल दरम्यान दक्षिण कोरियाच्या सेऊल येथे आयोजित वुमन एशिया कप सॉफ्टबॉल चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सई जोशी ही या स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातुन फक्त पाच मुलींची निवड करण्यात आली आहे.

त्यात जळगावच्या सई जोशीसह स्वप्नाली वायदंडे (कोल्हापूर), ऐश्वर्या बोडके (पुणे), श्रद्धा जाधव (लातूर), ऐश्वर्या भास्करन (मुंबई) यांचा समावेश आहे. सई जोशी हिने यापूर्वी चीन, तैवान येथील स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून आतापर्यंत अनेक वेळा राज्य, राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत सुवर्ण, सिल्व्हर आणि ब्राँझ मेडल मिळविले आहेत. गत वर्षी शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्काराने सई जोशी ला सन्मानित करण्यात आले होते.
सई जोशी ही जैन इरिगेशन सिस्टिम्स च्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी व जळगाव जनता बँकेच्या अधिकारी नीलम जोशी यांची कन्या आहे. तिच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे, सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क. ब. चौ उमवी समाजकार्य विभाग राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा शेरी येथे समारोप…

Next Post

श्री. सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

Next Post

श्री. सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo