Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांगांसाठी सर्व जिल्ह्यात संकेतस्थळ सुरू करण्याबाबत विचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
दिव्यांगांसाठी सर्व जिल्ह्यात संकेतस्थळ सुरू करण्याबाबत विचार

बीड येथे ‘दिव्यांगसाथी’ संकेतस्थळाचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला शुभारंभ

मुंबई, दि. 2 : दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्र याचबरोबर दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देणे सुकर करण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘दिव्यांगसाथी’ (divyangsathizpbeed.com) या विशेष संकेतस्थळाचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Maha Info Corona Website

याप्रसंगी अशा प्रकारचे संकेतस्थळ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असावे या दृष्टिकोनातून विभागाला सूचना करण्यात येतील, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.

या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील सर्व गावातील ग्रामसेवकांमार्फत येत्या एक महिन्याच्या आत दिव्यांग व्यक्तींची माहिती भरण्यात येईल, यामध्ये प्रामुख्याने त्यांचे आधार कार्ड, बँक खाते, दिव्यांग प्रमाणपत्र आदी बाबींचा समावेश असेल; जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके हे यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी दिली.

या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी करून, प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना ३ टक्के खर्च योजना, विमा, पेन्शन, एसटी-रेल्वे पास इत्यादी योजनांचा लाभ मिळवून देणे, पात्र लाभार्थींना स्वावलंबन कार्ड मिळवून देणे, तपासणी व ऑनलाईन नोंदणी, तसेच आरोग्यविषयक सेवा मिळवून देणे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे.

अशा प्रकारचे संकेतस्थळ असावे अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती, त्याला प्रतिसाद देत त्यासाठी सर्वात प्रथम त्यांच्याच बीड जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे संकेतस्थळ आकाराला आणले त्याबद्दल धनंजय मुंडे यांनी श्री.येडके व श्री.मडावी यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण सह शहरी भागातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंद घ्यावी, सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत विभागाची प्रत्येक योजना पोहोचविण्यासाठी मदत व्हावी असे चोख नियोजन करून हा उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना यावेळी श्री.मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके यांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लाॅकडाऊनला बंदी न समजता कोरोनाची साखळी तोडण्याची संधी समजू या; डॉ.अजित थोरबोले यांचे रावेर यावल तालुक्यातील नागरिकांना आवाहन

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात ३ मे रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यु – जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे

Next Post
उस्मानाबाद जिल्ह्यात ३ मे रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यु – जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे

उस्मानाबाद जिल्ह्यात ३ मे रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यु - जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे

Comments 2

  1. Aditya Ambhore says:
    6 years ago

    I am deaf use sing language yes in Nagpur ok

    • टिम-सत्यमेव जयते टिम-सत्यमेव जयते says:
      6 years ago

      Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Lw2u56VssJL4RyhdXtSagd

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo