Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांग दोष/व्यंग असणाऱ्या बालकांची नोंद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडे करावी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 9 :- दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 कायदा पारित केलेला आहे. या कायद्यान्वये शारिरीक दोष, व्यंग असणाऱ्या 6 वर्षाखालील बालकांचे शारिरिक, मानसिक व शैक्षणिक पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने जिल्हा दिव्यांग पुनर्वन केंद्र, जळगाव यांच्यामार्फत दिव्यांग बालकांचे पुनर्वसन होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअंतर्गत विविध थेरेपी सेवा, शस्त्रक्रिया, थेरपी प्रशिक्षण, शैक्षणिक संधी व विकास याबाबत मार्गदर्शन तसेच सेवा/सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील गतीमंद, मतीमंद, स्वमग्न, वाचा दोष, कर्णदोष, दृष्टीदोष, शारिरीक दोष व व्यंग तसेच मानसिक विकासात्मक बाधा असलेल्या बालकांच्या पालकांनी नावे नोंदविणे प्रस्तावित आहे. नोंदणी झालेल्या बालकांची तज्ञांमार्फत वैद्यकीय तपासणी व विकासातील विलंबांचे मुल्यामापन करून त्यांना गरजेनुरूप थेरेपी  तसेच सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील . तरी जिल्ह्यातील शारिरीक दोष, व्यंग असणाऱ्या बालकांच्या पालकांनी आपल्या मुलांची नावे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0257-2260528 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उर्दू साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल असलम तनवीर यांना वकार-ए-क़लम अवार्ड

Next Post

संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट

Next Post

संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo