Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने करुन शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या -मंत्री बच्चू कडू

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
कामगारांचे नियमबाह्य वेतन कपात करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा -कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची नोंद व त्याची सर्व अनुषंगिक माहिती संकलन करण्यासाठी दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करा. सर्व्हेक्षणाव्दारे प्राप्त माहितीनुसार दिव्यांगांना शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ प्राधान्याने द्या, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

दिव्यांगाकरीता असलेला पाच टक्के निधी खर्चाबाबत आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार,अकोट उपवनसंरक्षक नवल रेडी, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, श्रीकांत देशपाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील दिव्यांगाकरीता प्राप्त झालेल्या दिव्यांग निधी खर्चाचा महानगरपालिका, नगरपरीषद व सर्व पंचायत समिती निहाय आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी राखीव निधी तातडीने खर्च करुन दिव्यांगाना अंत्योदय योजनाचा प्राधान्याने लाभ द्या. तसेच बोगस अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्यावर कार्यवाही करुन दिव्यांगाना या योजनेत सामावून घ्या.

जिल्ह्यातील दिव्यांगाचे सर्व्हेक्षण घरोघरी जावून तातडीने पूर्ण करा. सर्व्हेक्षण करताना प्राप्त होणारा डाटा हा एकत्रीत स्वरुपात तयार करुन दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ त्यांच्याप्रयत्न पोहोचवा. शासकीय व निम्म शासकीय विभागात दिव्यांगाना आरक्षण दिले असल्याची खात्री करा. तसेच जिल्ह्यात दिव्यांगाचा अनुशेष राहणार नाही याची दक्षता घ्या, असेही निर्देश यावेळी दिले.

Team Satymev Jayate

Previous Post

लोंढे शिवार रस्त्याचे आ. मंगेश चव्हाण व गुणवंत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक -मुख्यमंत्री

Next Post
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक -मुख्यमंत्री

प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक -मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo