Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दुकान, आस्थापनेचे फलक मराठीत लावावे : जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.८ – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत शासन अधिसूचनेनुसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक मराठीतून प्रदर्शित करणे अनिवार्य केले आहे. त्या अनुषंगाने झालेल्या बदलांबाबत सुविधाकर तथा दुकान निरीक्षकांकडून जिल्हाभरात तपासणी सुरू करण्यात आली असून मराठी नामफलक नसलेल्या दुकानांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. शासनाच्या निर्देशांचा आदर करीत प्रत्येकाने आपले दुकान, आस्थापनेचा नामफलक मराठीत लावून घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया यांनी केले आहे.

शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक दुकान, आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे अनिवार्य आहे. परंतु दुकान, आस्थापनेच्या मालकाकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. निर्देशानुसार मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरवले किंवा विकले जाते, अशी आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे लिहिता येणार नाहीत, अशा सक्त सूचना सहाय्यक कामगार आयुक्त चं.ना.बिरार यांनी केल्या आहेत.

शासनाच्या आदेशाचे पालन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी नामफलकात बदल करून घ्यावे. कारवाई टाळण्यासाठी नियमानुसारच वागावे आणि लवकरात लवकर आवश्यक तो बदल करावा, असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

Next Post

अखिल भारतीय श्री जैन रत्न युवक और श्री जैन रत्न युवक परिषद ईनके तरफसे ग्रीष्म कालीन जैन धार्मिक बालक संस्कार शिविर का आयोजन

Next Post

अखिल भारतीय श्री जैन रत्न युवक और श्री जैन रत्न युवक परिषद ईनके तरफसे ग्रीष्म कालीन जैन धार्मिक बालक संस्कार शिविर का आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo