Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दुबार मतदार नोंदणी होवू नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जळगाव(जिमाका)- कोणताही मतदार दुबार/बोगस नोंदणी होणार नाही याकरीता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. भारत निवडणूक आयोगामार्फत 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत सुरु आहे. याबाबत राजकीय पक्षांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, मतदार याद्या सुलभ होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले बुथनिहाय प्रतिनिधी (BLA) नेमावे त्याचबरोबर ज्याप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात आल्या त्याच धर्तीवर शहरात वार्डनिहाय सभा घेऊन त्यात मतदार याद्यांचे वाचन करावे. तसेच नागरीकांना मतदार याद्यांबाबत काही अडचणी, शंका असल्यास त्यांनी आपल्या भागातील बुथ लेव्हल ऑफिसर (BLO) शी संपर्क साधावा.

आपल्या भागातील बुथ लेव्हल ऑफिसरची माहिती www.jalgaon.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध त्याचबरोबर नागरीकांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री. हुलवळे यांनी मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित तयार होणारी मतदार यादी ही आगामी निवडणूकांसाठी वापरण्यात येणार असल्याने सर्व राजकीय पक्षांनी सजग राहून ही मतदार यादी सुलभ होण्यासाठी लक्ष्य गट निश्चित करावे. 13 व 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात 9632 नवीन फार्म जमा झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष गा्रमसभेत दावे/ हरकती प्राप्त झाल्याची माहिती दिली.

त्याचबरोबर येत्या 27 व 28 नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नव मतदारांनी नोंद होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Team Satymev Jayate

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम पाडले बंद

Next Post

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष

Next Post
प्रादेशिक परिवहन विभागातर्फे  प्रवाशांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo